मुंबई, 15 एप्रिल : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राज्यातील निवडणुकीसाठी मतदान एकाच दिवशी होणार आहे. दहा मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 20 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. मात्र आता राष्ट्रवादीने देखील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज राष्ट्रवादीची बैठक
कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर आज राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणूक लढण्याबाबत आज राष्ट्रवादी निर्णय घेणार आहे. पक्षाकडून 50 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करण्यात येण्याची शक्यता आहे. आजा राष्ट्रवादी कर्नाटक विधनसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
निवडणूक आयोगाचा धक्का
दरम्यान काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीसोबतच तृणमूल काँग्रेसचा देखील राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे आपला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय दर्जा गमवल्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी अॅक्टिव मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.
50 पेक्षा अधिक जागा लढवण्याची शक्यता
राष्ट्रवादीकडून कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत उमेदवारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 50 पेक्षा अधिक जागांवर राष्ट्रवादी आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.