चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 30 एप्रिल : मागील वर्षी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर गंभीर आरोप केला होता. संजय राऊत मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणात एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
संजय राऊत यांचे पार्टनर, सुजित पाटकर यांचा लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार राजू नंदकुमार साळुंखे यांना पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिला आहे. भाजप नेते किरीट सोमैय्यानी हा घोटाळा उघडकीस आणला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. या प्रकरणी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीचा विरुद्ध मुंबई पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर कोविड सेंटरमध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर पुणे महानगरपालिकेने तसेच PMRDA ने सदर कंपनी विरुद्ध तक्रार दाखल केली होती.
तुमच्या शहरातून (पुणे)
किरीट सोमय्यांचा आरोप काय?
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोना काळात मोठा घोटाळा झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे काम अस्तित्वात नसलेल्या लाइफ लाइन कंपनीला उद्धव ठाकरे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. याचदरम्यान अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असं किरीट सोमय्या म्हणाले होते.
वाचा – पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार? अजित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन कंपनीला कोरोना काळात शिवाजीनगर येथे कोविड सेंटर उभारण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी ती कंपनी अस्तित्वात नव्हती. सर्व नियम डावलून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी हे काम संबंधित कंपनीला दिले. त्यावेळी कशा प्रकारे बिलं दिलं जात होती, ते आपण सर्वांनी पाहिले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.