रत्नागिरी, 6 मे : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. ते आपल्या या दौऱ्याची सुरुवात सध्या वादग्रस्त ठरत असलेल्या बारसू प्रकल्पापासून करणार आहेत. उद्धव ठाकरे बारसूमध्ये जाऊन प्रकल्पाला विरोध असलेल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मात्र दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याच परिसरात प्रकल्पाला समर्थन देणाऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचं म्हटलं आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तर दुसरीकडे राणे यांचा मोर्चा यामुळे आज या परिसरात वातावरण तापण्याची शक्यता आहे.
ठाकरे, राणे आमने-सामने?
आज उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. ते आपल्या या दौऱ्याची सुरुवात बारसूपासून करणार आहेत. बारसूमधील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा विरोध आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इथे आंदोलन सुरू आहे. उद्धव ठाकेर आपल्या या दौऱ्यामध्ये आंदोलकांची भेट घेणार असून, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तर दुसरीकडे नारायण राणे यांनी देखील बारसूला समर्थन करणाऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे ठाकरे आणि राणे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जऊ शकते.
तुमच्या शहरातून (मुंबई)
रत्नागिरीत आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार; मनसेचं कोकणात जोरदार शक्तिप्रदर्शन
नेमकं काय आहे प्रकरण?
बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र या प्रकल्पाला स्थानिकांकडून जोरदार विरोध केला जात आहे. इथे रिफायनरी झाल्यास प्रदूषण वाढेल. आंबा, काजू, सुपारी यासारख्या पिकांच्या बागा धोक्यात येतील, असं येथील स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकल्पाला जोरदार विरोध होत आहे. स्थानिकांचा विरोध असूनही प्रकल्पासाठी मातीचे परीक्षण सुरू झाल्यानं स्थानिक आक्रमक झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.