ठाणे, 6 मे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भिवंडीत भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे भिवंडी लोकभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता भाजपला दुसरा मोठा धक्का बसला आहे.
दहा दिवसांत दुसरा मोठा धक्का
भिवंडीमध्ये गेल्या दहा दिवसांत भाजपला दुसरा धक्का बसला आहे. दहा दिवसांपूर्वीच भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
रत्नागिरीत आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार; मनसेचं कोकणात जोरदार शक्तिप्रदर्शन
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचं राजकारण
राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणूक देखील जवळ आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फोडाफोडीच राजकारण जोरदार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटानं ठाकरे गटाला मोठा धक्का दिला होता. नाशिकमधील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. तर आज ठाकरे गटानं भाजपला धक्का दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.