मुंबई, 15 मे : ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आज सकाळी 11 वाजता विधन सभा सचिवांची भेट घेणार आहेत. गुरुवारी सर्वोच्च न्ययालयानं राज्याच्या संत्तासंघर्षावर निकाल दिला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. अनिल परब हे आज सचिवांची भेट घेणार आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचे पालन करून आपत्र आमदारांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, यासाठी परब सचिवांना निवेदन देण्याची शक्यता आहे.
सचिवांना निवेदन देण्याची शक्यता
शिवसेनेतील 16 आमदारांना पात्र किंवा अपात्र ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयानं विधान सभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे विधान सभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलंय. त्यातच आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब विधान सभा सचिवांची भेट घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार अपात्र आमदारांसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा मागणीचं निवेदन ते सचिवांना देण्याची शक्यता आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
काय आहेत सुप्रीम कोर्टाचे आदेश?
गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टानं राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला. हा निकाल देताना न्यायालयाकडून शिंदे गट आणि तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढण्यात आले. शिंदे गटाने नियुक्त केलेले मुख्य प्रतोत भारत गोगावले यांची नियुक्ती देखील घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. तसेच आमदारांच्या अपात्रेसंदर्भात विधान सभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.