पाच राज्यातील निवडणूक निकाल आता जवळपास हाती आल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा व पंजाब पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुर आहे. दरम्यान, पंजाब वगळता अन्य् चार राज्यातील निकालाचा कल भाजपच्या बाजूने दिसून येत आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभाही घेतली होती. सकाळी 10 वाजेपर्यंत शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचे दिसून आले. यावर भाजप नेते किरीट सोमय्यां यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
किरीट सोमय्यां म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे जी आणि आदरणीय संजय राऊत जी गोव्यात शिवसेना कुठे आहे!!??’ असा सवाल शिवसेनेला करत सोमय्या यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
गोव्यात शिवसेनेने 10 उमेदवार उभे केले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने 13 उमेदवार उभे केले होत. दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचे दिसून आले. शिवसेनेला 0.25 टक्के मतदान होते. राष्ट्रवादी काँग्रेसला 0.83 टक्के मिळाली. तर, नोटा पर्यायाला 1.20 टक्के मतदान मिळाले.