ठाणे : राज्यात काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस आहे, तर काही ठिकाणी तापमानाने रेकॉर्ड ब्रेक नोंद केली आहे. एप्रिल महिन्यातच मुंबईसह ठाणे आणि उपनगर भागातील नागरिक हैराण झाले आहेत. त्याचं कारण म्हणजे रोज वाढणारं तापमान. या वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद ठाण्यात करण्यात आली आहे.
ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी 41. 7 डिग्री तापमान होतं. त्यामुळे उन्हात बाहेर पडलेल्या ठाणेकरांचे पुरते हाल झाले होते. आजही ४० ते ४३ डिग्री तापमान राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाणेकरांनी दुपारी बाहेर जाणं टाळावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा, त्यासाठी छत्री किंवा स्कार्फ वापरा ज्यामुळे त्रास कमी होऊ शकतो असंही आवाहन करण्यात आलं आहे. राज्यात उष्माघाताने दोन बळी गेले आहेत. जळगाव आणि हिंगोली दोन बळी गेले असताना आता ठाण्यात वाढत्या तापमानामुळे चिंता वाढली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
उन्हात लेकरांची घ्या काळजी! हिंगोलीत उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
Heat Wave : सूर्य आग ओकतोय! मुंबईकरांना उन्हाचा तडाखा, ठाणेकरांना चटके पारा 43 अंशांवर
उष्माघाताची लक्षणं आणि कशी घ्यायची काळजी
चक्कर येणे, मानसिक बदल, मळमळ ही प्राथमिक लक्षणं आहेत. जेव्हा शरीराचे तापमान ४०° सेल्सिअसपेक्षा जास्त वाढते आणि शरीराची थंड होण्याची क्षमता नष्ट होते तेव्हा उष्माघात होतो.
– भरपूर पाणी प्या, आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी प्रयत्न करा. फळांचा समावेश आहारात करा
– जास्त घट्ट कपडे घालण टाळा, त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो
– दुपारी 11 ते 3 यावेळात बाहेर फिरणं शक्यतो टाळाच
– या वेळेत चुकून बाहेर पडण्याची वेळ आली तर छत्री किंवा स्कार्फने डोकं बांधा
– थंड पाण्याने हात पाय धुवत राहा आणि उपाशी राहू नका
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.