मुंबई, 28 मार्च : एसटी कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन करणारे ऍड गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. राज्य बार काऊन्सिल आणि ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्यामुळे दोन वर्ष वकिली करण्यास मज्जाव केला आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला चिथावणी दिल्याचा सदावर्ते यांच्यावर आरोप होता.
तुमच्या शहरातून (मुंबई)
तसंच काळा कोट परिधान केलेला असताना हातात पट्टी बांधणे हे वकिली पेश्याला साजेशे नसून त्यांनी मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना दरम्यान मीडियासमोर चुकीची वक्तव्य केल्याचा दावा करत सदावर्ते यांच्याविरोधात बार कौन्सिलकडे करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने देखील सदावर्ते यांच्या विरोधातील शिस्तभंगाची कारवाई थांबवण्यास नकार दिला होता.
काय आहे प्रकरण?
गुणरत्न सदावर्ते आणि वाद हा नवीन विषय नाही. महाविकास आघाडी सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं. त्यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं. या हिंसक आंदोलनाप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवणं आणि सिल्व्हर ओकवर हल्ला करण्याच्या आरोपांखाली सदावर्तेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचं प्रकरण समोर आलं. यानंतर सदावर्तेंवर एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करुन खोटे आश्वासन देवून पैसे वसूल केल्याच्या आरोपांप्रकरणे राज्यातील काही भागांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तर काही ठिकाणी छत्रपती घराण्याच्या वंशजांवर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.