देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ होणार आहे. 22 मार्चपासून देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोल 101.01 रुपये प्रति लीटर तर डिझेल 92.27 रुपये प्रतिलीटर मिळणार आहे. मागील 9 दिवसातील ही आठवी इंधन दरवाढ आहे.
दररोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशालाचा चाप बसत आहे. महगाई गगनाला भिडली असताना दुसरीकडे इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे.
इंधन दरवाढीवर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण –
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. यावरुन विरोधीपक्षाने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. वाढत्या इंधनाच्या दरावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी राज्यसभेत इंधन दरवाढीवर मौन सोडलं. इंधनाच्या वाढत्या किंमती आपल्यासाठी एक मोठं आव्हान आहे. अर्थ विधेयकावर चर्चा करताना सीतारमण यांनी म्हणाल्या की, 2010-11 पासून 2021-22 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरील सेस साठी केंद्र सरकारने 11.37 लाख कोटी रुपये खर्च केले आहे.