दिल्ली, 17 एप्रिल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (14 एप्रिल) नुकतीच सर्वत्र उत्साहात साजरी झाली. या निमित्तानं देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. देशात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. राजस्थान येथील जैसलमेर शहरातील आंबेडकर पार्कमध्येसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. आयएएस अधिकारी टीना डाबी यादेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मी सनदी अधिकारी होऊ शकले,’ असं त्या म्हणाल्या.
टीना डाबी या दलित समाजातील असून, त्या यूपीएससी परीक्षेत टॉप करून आयएएस अधिकारी बनल्या आहेत. त्या स्वतःच्या यशाचं श्रेय हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देतात. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी सनदी अधिकारी होऊ शकले,’ असं त्या अभिमानानं सांगतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात टीना डाबी म्हणाल्या, ‘मी दलित समाजातील आहे. जर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते, तर मी पण आज जिल्हाधिकारी नसते.’
जॉब जॉईन करण्याआधीच कंपनीचं वर्क कल्चर जाणून घ्यायचंय? मग Interview मध्ये हे 5 प्रश्न विचाराच
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, महिला समानता अशा मुद्द्यांवर भर दिला. समानतेचा अधिकार त्यांच्यामुळेच सर्वांना मिळाला आहे,’ असं टीना डाबी यांनी सांगितलं. त्या पुढं म्हणाल्या, ‘डॉ. आंबेडकरांमुळेच आज आपण सर्वजण येथे आहोत. देशासाठी त्यांनी दिलेलं योगदान कधीच विसरता येणार नाही.’
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी मूल्य आणि लोकशाहीची मूल्य आत्मसात करून राज्यघटनेची केलेली निर्मिती खरोखरच अतुलनीय आहे. नशिबापेक्षा स्वतःच्या कर्मावर लक्ष केंद्रीत करा, त्यामुळे तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यात नक्की यश मिळेल,’ असा मोलाचा सल्लाही टीना डाबी यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना दिला.
टीना डाबी या यूपीएससी 2016 च्या टॉपर असून, सध्या राजस्थानमध्ये कार्यरत आहेत. मूळच्या दिल्ली येथील रहिवासी असणाऱ्या डाबी या यूपीएससीमध्ये टॉप ठरल्यानंतर त्यांची देशभरात चर्चा झाली होती. यूपीएससी परीक्षा ही देशातील सर्वांत अवघड परीक्षा समजली जाते. ही परीक्षा डाबी या केवळ उत्तीर्ण झाल्या नाहीत, तर त्या देशात टॉपर होत्या. संघर्षमय प्रवास करीत त्यांनी हे यश मिळवलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.