न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एडल्ट स्टारनंतर आता लेखिकेनं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे सध्या जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील निवडणुकीआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हे गंभीर आरोप त्यांना अडचणीचे ठरू शकतात आणि त्यांचे पाय अधिक खोलात जाण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र त्याआधीच पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. माजी स्तंभलेखक ई जीन कॅरोल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
लैंगिक छळ प्रकरणी मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान कॅरोलने न्यूयॉर्कच्या ज्युरीला सांगितले की ट्रम्प यांनी त्यांच्यावर बलात्कार केला आणि नंतर अपमानास्पद बोलून त्यांची खिल्ली उडवली.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना 1.22 लाख डॉलर्सचा दंड, म्हणाले ‘मी निर्दोष तरीही…’
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, कॅरोल यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी 1996 मध्ये न्यूयॉर्कच्या डिपार्टमेंटल स्टोअरच्या चेंजिंग रूममध्ये त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा आरोप अत्यंत गंभीर असून त्यावरून अमेरिकेतच नाही तर जगभरात चर्चा सुरू झाल्या आहेत. एका पुस्तकात हे आरोप सार्वजनिक झाल्यानंतर खोटे बोलल्याचा आरोप केला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांनी माझ्यावर बलात्कार केला आणि जेव्हा मी याबद्दल लिहिले तेव्हा ते म्हणाले की असं काहीच झालं नाही. त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्याने खोटे बोलून माझी प्रतिष्ठा खराब केली. या सगळ्यातून बाहेर पडून मी पूर्वीसारखं आयुष्य जगण्याचा अजूनही प्रयत्न करत आहे असं कॅरोल म्हणाल्या.
Donald Trump : आत्मसमर्पणासाठी ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये दाखल, कडेकोट सुरक्षा व्यवस्था
ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याच वेळी, न्यायाधीशांनी ट्रम्प यांना त्यांच्या सोशल मीडिया साइटवर या प्रकरणाबद्दल पोस्ट न करण्याचा इशारा दिला. सोशल साइटवर, ट्रम्प यांनी कॅरोलच्या आरोपांना हा मुद्दा करण्यात आलेला आरोप मला अडकवण्याचा डाव असल्याचं म्हटलं आहे. न्यायाधीशांनी ट्रम्प यांची पोस्ट ‘पूर्णपणे अयोग्य’ असल्याचे म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.