नीलम कराळे, प्रतिनिधी
पुणे, 12 एप्रिल : कर्तव्यदक्षता, आपल्या कामाशी बांधिलकी या गोष्टी फक्त ड्युटीवर असतानाच बजावायच्या नसतात. तर अंगावर वर्दी नसली तरी आपण ते कर्तव्य पार पाडले पाहिजे. ही जाणीव खूप कमी जणांमध्ये असते. पुण्यातील फायर ब्रिगेडचे जवान हर्षद येवले या दुर्मीळ मंडळींपैकी एक आहेत. जत्रेसाठी कुटुंबीयांसोबत गावी चाललेल्या येवले यांना भर रस्त्यात BMW पेटलेली दिसली. त्यावेळी त्यांनी जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावले.
काय आहे प्रकरण?
तुमच्या शहरातून (पुणे)
कोंढवा बुद्रुक फायर स्टेशनचे फायरमन हर्षद येवले हे आपल्या कुटुंबासोबत जत्रेसाठी जात होते. त्यावेळी उंद्री येथे त्यांना भररस्त्यात BMW कार पेटलेली दिसली. त्यावेळी येवले यांना आपल्या ड्युटीची जाणीव झाली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता गाडीमधील अग्निविरोधक उपकरणं वापरुन कर्तव्य चोख बजावले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचवेळी त्यांनी फायर ब्रिगेडच्या ऑफिसशी संपर्क साधला. त्यानंतर कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग पुर्णपणे विझवली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ‘ही कार सर्व्हिसिंगनंतर गाडीच्या मालकाकडं डिलिव्हरीसाठी नेण्यात येत होती. त्यावेळी रस्त्यावर कारला पाठीमागच्या बाजूला आग लागली. गाडीला आग लागल्याचा ड्रायव्हरला पत्ताच नव्हता. काही किलोमीटर गाडी पुढे गेल्यावर रस्त्यावरील सजग नागरिकांनी ड्रायव्हरला आग लागल्याचं सांगितलं.
अपघात होताच नातेवाईकांना मिळणार अलर्ट! जालनाच्या रँचोनं तयार केलं भन्नाट यंत्र, पाहा Video
गाडीचा ड्रायव्हर तातडीनं बाहेर पडला. पण तोपर्यंत कारनं पेट घेतला होता. ही कार विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच येवले यांनी त्यांचे कर्तव्य चोख बजावले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.