मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये वेगवेगळ्या टीममधून खेळत असले तरी खेळाडूंची मैत्री आपण कायमच पाहतो. पण मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातल्या सामन्यात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन खेळाडू एकमेकांना भिडले. मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादव मध्ये पडला नसता तर हा वाद वाढला असता. मैदानातला हा हाय व्होल्टेज वाद ऋतिक शौकीन आणि केकेआरचा कर्णधार नितीश राणा यांच्यात झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नितीश राणा ऋतिक शौकीन दिल्लीकडून स्थानिक क्रिकेट खेळतात. या दोघांमधला वाद केकेआरच्या इनिंगच्या 9व्या ओव्हरमध्ये झाला. ऋतिकच्या बॉलिंगवर नितीश राणा स्ट्राईकला होता. ऋतिकच्या पहिल्या बॉलवर नितीशने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल बॅटवर नीट आला नाही. हवेत गेलेल्या बॉलवर रमणदीप सिंहने सोपा कॅच पकडला.
नितीश राणाची इनिंग 10 बॉलमध्येच संपली. लवकर आऊट झाल्यानंतर निराश झालेला नितीश राणा डगआऊटच्या दिशेने चालला होता, तेव्हा ऋतिक काहीतरी म्हणाला, ज्यामुळे नितीशचा पारा चढला. नितीश आणि ऋतिक समोरासमोर येणारच होते, पण तेवढ्यात तिकडे सूर्यकुमार यादव आला आणि त्याने मध्यस्थी केली. यावेळी सूर्यासोबत पियुष चावलाही होता. नितीश आणि ऋतिक यांनी एकमेकांबद्दल अपशब्दही वापरले.
A few words exchange between Hrithik Shokeen AND Nitish Rana#MIvsKKR #NitishRana #Shokeen #NitishVSHrithik pic.twitter.com/dk1EezSUTM
— Aniket Shukla (@AniketShuklaa) April 16, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.