मॉस्को, 03 मे : गेल्या एका वर्षांपासून रशिया आणि युक्रेमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाला आज निर्णायक वळण मिळालं. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्यावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा रशियन सरकारने केला आहे.
मंगळवारी रात्री यूक्रेनने राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे. रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयावर ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सुद्धा शेअर करण्यात आला आहे. राष्ट्रपती कार्यालयावरच ड्रोनने हल्ला करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. रशियन सरकारने पुतिन यांना जीव मारण्याचा हा प्रयत्न होता असा आरोप केला आहे.
#WATCH | Russia today alleged that there were attempts by Ukraine to assassinate President Putin, saying it was a “terrorist attack” while claiming it shot down drones over the residence of Putin
(Video: Russia’s RT news) pic.twitter.com/6b7jkeYluT
— ANI (@ANI) May 3, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.