दिल्ली, 17 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला आतापर्यंत पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. जर गुरुवारी पंजाब विरुद्धचा सामना त्यांनी गमावला तर प्लेऑफच्या शर्यतीतून ते बाहेर होऊ शकतात. याचे परिणाम त्यांच्या सपोर्ट स्टाफला भोगावे लागू शकतात. दिल्ली कॅपिटल्स पुढच्या हंगामात सध्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये कपात करण्याची शक्यता आहे.
प्रमुख प्रशिक्षक रिकी पाँटिंग संघासोबत राहणार की नाही याचाही निर्णय होऊ शकतो. तर डेव्हिड वॉर्नरने यंदाच्या हंगामात दिल्लीकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय न घेतल्यास तो यंदाच्या हंगामात अखेरपर्यंत कर्णधार राहील.
IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या संघाने का घातली होती WPLची जर्सी?
आयपीएलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात मधेच काही निर्णय घेतला जाणार नाही. मात्र सलग दोन हंगामातील खराब कामगिरीमुळे फ्रँचाइजीकडून समीक्षा केली जाईल. पण पुढच्या हंगामात इतका मोठा सपोर्ट स्टाफ नसेल हे नक्की. यातील काहींना हटवण्यात येईल.
दिल्ली कॅपिटल्सच्या सध्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये मेंटर म्हणून सौरव गांगुली, प्रमुख प्रशिक्षक रिकी पाँटिंग, सहाय्यक प्रशिक्षक जेम्स होप्स, अजित आगरकर, शेन वॉटसन, प्रवीण आमरे, बीजू जॉर्ज यांचा समावेश आहे.
यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे पाच सामने झाले असून या सर्व सामन्यात त्यांचा पराभव झाला. लखनऊविरुद्ध ५० धावांनी, गुजराविरुद्ध ५ विकेटने, राजस्थानविरुद्ध ५७ तर आरसीबीविरुद्ध २३ धावांनी आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध ६ विकेटने संघाला पराभव पत्करावा लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.