बालाजी निरफळ, प्रतिनिधी
धाराशिव, 18 मे : तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आता मंदिर प्रशासनाने नवीन अट घातली आहे. तुळजाभवानी मंदिरात आता अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्री अर्थात प्रवेश बंदी असणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले असून त्याची
अंमलबजावणी तात्काळ सुरू केली आहे. भारतीय संस्कृतीचा हवाला देत मंदिर संस्थान हा निर्णय घेतला असून या निर्णयावर पुजारी आणि भाविक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्णपीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या तुळजाभवानीच्या मंदिरात आता पारंपारिक कपडे घालूनच प्रवेश मिळणार आहे. वेस्टर्न कपडे, अंग प्रदर्शन करणारे कपडे तसेच बरमुडा घालून भाविकांना प्रवेश करता येणार नाही. या निर्णयाचे फलक आता मंदिर संस्थानाने मंदिर आणि आवाराच्या परिसरात लावले आहेत. अचानक मंदिर संस्थांनाने घेतलेल्या या निर्णयाचे पुजारी स्वागत करत आहेत, तर भाविक मात्र यावर समिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यातूनच नाही तर परराज्यातूनही भावी मोठ्या प्रमाणात येत असतात. मंदिर संस्थांनाने हा निर्णय घेतला आणि याची अंमलबजावणी तात्काळ सुरू केली मात्र, ही अंमलबजावणी करताना बालकांना यात सूट मिळावी, अशी मागणी भाविक करत आहेत, तर स्त्रीने दर्शनासाठी येताना संस्कृती जपलीच पाहिजे अशा प्रतिक्रिया महिलांकडून येत आहेत.
मंदिर संस्थानाने घेतलेल्या या निर्णयाला आतापर्यंत कोणी विरोध केला जरी नसला तरी निर्णयाची अंमलबजावणी करताना निर्माण होणाऱ्या त्रुटीवरून पुढील काळात वाद होण्याची चिन्ह आहेत. एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतरही मंदिर अधिकारी मात्र माध्यमांसमोर बोलायला तयार नाहीत. दुसरीकडे अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या रांजणगावच्या मंदिरातही अंग प्रदर्शन करणारे आणि अशोभनिय वस्त्र घालून प्रवेश मिळणार नसल्याचं मंदिर प्रशासनाने सांगितलं आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या ‘त्या’ प्रकाराची फडणवीसांकडून गंभीर दखल; गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.