मुंबई : दोन तरुणींसोबत बाईकवर थरारक स्टंट करणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. बाईक स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी रविवारी एका 24 वर्षांच्या तरुणाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा हिस्ट्री शीटर असून त्याच्यावर अँटॉप हिल आणि वडाळा टीटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
नुकतंच आरोपीने दोन मुलींसह त्याच्या दुचाकीवर थरारक स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुंबई पोलिसांनी फैयाज कादरी नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे.
तो दोन तरुणांसोबत बाईकवर स्टंट करत होता. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी परिसरात ही घटना घडल्याची माहिती मिळाली. व्हिडिओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची चौकशी करून त्याला पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं.
तुमच्या शहरातून (मुंबई)
कार, बाईक नाही तर थेट घोड्यावर बसून चोराने केली चोरी, Video तुफान व्हायरल
#WATCH | Mumbai Police arrested a man namely Faiyaz Qadri, whose bike stunts with two women seated on his two-wheeler had gone viral. The accused was arrested by BKC police under whose jurisdiction the incident took place: Mumbai Police
(Viral video, confirmed by Police) pic.twitter.com/CCRUPNOq4A
— ANI (@ANI) April 2, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.