नवी दिल्ली 20 एप्रिल : काही काळापूर्वी श्रद्धा वालकरच्या मृत्यू प्रकरणाची देशभर चर्चा झाली होती. या हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून सोडलं होतं, कारण यामध्ये मारेकऱ्याने या तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. पण तुम्हाला माहिती आहे का? की हाँगकाँगमध्ये एका प्रसिद्ध मॉडेलची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याची आणखी एक घटना समोर आली होती. मात्र या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मारेकऱ्यांनी तिच्या कवटीचं सूप बनवून ते प्यायलं होतं. हे उघड झाल्यावर मॉडेलच्या पतीचं नावही समोर आलं.
हाँगकाँगच्या या मॉडेलचं नाव एबी चोई होतं. या 28 वर्षीय मॉडेलचा आधीच्या पतीसोबत आणि त्याच्या कुटुंबाशी मालमत्तेवरून आर्थिक वाद सुरू होता. यावरून बराच वाद झाला होता. यावर्षी 21 फेब्रुवारीला एबीच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार केली. मॉडेल गायब झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली. बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी शहरातीलच एका घरातील फ्रीजमध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे सापडले होते. त्या घरात इलेक्ट्रिक करवत, मांस कापण्याचे मशीन आणि काही कपडे सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
यानंतरची कहाणी आणखीनच भयानक होती. मॉडेलच्या शरीराचे काही भाग सापडले नाहीत, मात्र नंतर पोलिसांना तिचं हरवलेलं शीर सूप पॉटमध्ये सापडलं, तेव्हा एकच खळबळ उडाली. हे सगळं इथेच थांबलं नाही. तर, तिच्या डोक्यावर कातडी किंवा मांस नसून गाजराचे आणि मुळ्यासारखे सूपचे तुकडे तरंगत असल्याचं तपासात समोर आलं. म्हणजेच तिच्या डोक्याचं सूप बनवून पिण्यात आलं होतं.
सासरच्या दारासमोर माहेरच्या लोकांनी जाळला तरुणीचा मृतदेह? कारण वाचून हादराच बसेल…
नंतर तपास पूर्ण झाला असता मॉडेलच्या हत्येत माजी सासरे आणि सासऱ्याच्या मोठ्या भावाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. अधिकाऱ्यांनी मॉडेलच्या एक्स पतीला अटक केली, परंतु त्याच्यावर कोणतेही आरोप दाखल केले गेले नाहीत. मात्र, नंतर या खुनाचे सर्व आरोपी पोलीस कोठडीत पोहोचले. याप्रकरणी अद्याप सुनावणी व्हायची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.