राजाराम मंडल (मधुबनी), 06 मे : नोकरीपेक्षा आपला स्वत:चा व्यवसाय असावा असे प्रत्येकाला वाटत असते. यामुळे केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्टार्टअप बिझनेसमुळे अनेकांना नवी उमेद मिळाली आहे. दरम्यान याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. यामुळेच बिहारमध्येही स्टार्टअपची भरभराट सुरू झाली आहे.
मधुबनीमध्येही एका मेकॅनिकल इंजिनिअरने ‘द मास्टर टच’ नावाचा सर्व्हिस प्रोव्हायडर स्टार्टअप सुरू केला आहे. त्यातून सर्वसामान्यांना मोठा रोजगार दिला आहे. मधुबनी जिल्हाधिकारी कार्यालय-कोर्ट कॅम्पसजवळ या कंपनीचे कार्यालय आहे. यातून अनेकांना रोजगार मिळाला आहे.
पुण्यात फक्त 99 रुपयांना मिळते अनलिमिटेड मिसळ! पाहा खास Video
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रोशन कुमारने आपले शिक्षण बंगळुरू येथून केले आहे. तो व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनीअर आहे. रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळं करायचं हेच ध्येय होतं.
स्वतःसोबतच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी त्याच्या मनात इच्छा होती. याच विचारातून त्यांनी ‘द मास्टर टच’ नावाची कंपनी सुरू केली आहे.
Nashik News: मिसळ म्हणजे नाशिकचीच! तब्बल 150 वर्षांची आहे परंपरा, जाणून घ्या संपूर्ण प्रवास VIDEO
रोशन यांच्या माहितीनुसार, त्यांच्या कंपनीत लोकांना त्यांच्या कौशल्यानुसार काम दिले जाते, ते सुशिक्षित ते अशिक्षितांना रोजगार देतात. लोकांच्या घरी अनेकदा सुतार, रंगारी, प्लंबर, मजूर अशी कामे असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.