मुंबई, 17 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा भूकंप होणार अशा बातम्यांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच ‘शक्यता जर सत्यात उतरली तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. जर करेक्ट कार्यक्रम करत असताना माझी काही गरज लागली तर मी करेन, पण कार्यक्रम तेच करतील’ असं सूचक विधान शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्यांना ऊत आला आहे. याच मुद्यावर उदय सामंत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
शक्यता जर सत्यात उतरली तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. अजितदादांची काम करायची वेगळी पद्धत आहे. मी स्वतः त्यांच्या सोबत 20 वर्ष काम केले आहे. जर करेक्ट कार्यक्रम करत असताना माझी काही गरज लागली तर मी करेन पण कार्यक्रम तेच करतील. पण आम्हाला सगळ्यांना आनंद असेल’ अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
(कुठेच बुद्धी वापरली नाही, उष्माघात मृत्यू प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड सरकारवर संतापले)
एक मे म्हणजे महाराष्ट्र दिनी वरळीमध्ये शिवसेना आणि भाजपची अशी सर्व पदाधिकाऱ्यांची सभा होईल. संध्याकाळी सहा वाजता ही सभा असेल. महाविकास आघाडी ज्या ठिकाणी सभा करते ते सर्व मंडपवाले माझ्या संपर्कात आहेत. दहा हजार खुर्च्या लावून एक लाख गर्दी झाली असे ते सांगतात, असा टोलाही सामंत यांनी मविआला लगावला.
(मुंबई महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, हायकोर्टाचा ‘शिंदे सरकार’च्या बाजूने कौल)
काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. आप्पासाहेब यांना हा पुरस्कार दिला. परंतु, दुर्दैवाने उष्माघातामुळे काही जणांचा मृत्यू झाला. परंतु विरोधक दुर्दैवाने टीका टिपणी करत आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी घ्यायचा होता. मात्र सर्वांना कार्यक्रम संपवून प्रत्येकाला घरी परतात आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री यांनी हा कार्यक्रम दुपारी ठेवला, असा खुलासाही सामंत यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.