मुंबई, 21 मे- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या 14 वर्षांपासून सलग ही मालिका टीव्हीवर प्रक्षेपित होत आहे. अनेकांना ही मालिका आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनल्याचं वाटतं. या कलाकारांना लोक अफाट प्रेम देत असतात. असं असताना दुसरीकडे मात्र मालिकेतील कलाकारांचं आणि निर्मात्यांचा गणित बिघडल्याचे दिसून येत आहे. एकपाठोपाठ एक कलाकार मालिका सोडून जात आहेत. तर मिसेस सोढी साकारणाऱ्या जेनिफर मेस्त्रीने तर निर्मात्यावर गंभीर आरोप लावत खळबळ माजवली आहे. दरम्यान आता बावरी साकारलेल्या मोनिका भदोरियानेसुद्धा गंभीर आरोप करत सर्वांना धक्का दिला आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम केलेली अभिनेत्री मोनिका भदोरियाने नुकतंच निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर सेटवर ‘गैरवर्तन’ केल्याचा आरोप करत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. मोनिका या शोमध्ये ‘बावरी’ ही व्यक्तिरेखा साकारत होती. दरम्यान आता तिने पुन्हा काही नवे आरोप केले आहेत. असित मोदी यांनी मुंबईत काम करु देणार नाही. अशी धमकी दिल्याचं तिचं म्हणणं आहे. मोनिका म्हणाली की ती आधीच मानसिक आघातात आहे आणि असित मोदीच्या धमकीमुळे ती आणखी खचली आहे. या सर्वांचा परिणाम तिच्या करिअरवर होत आहे.
(हे वाचा:Why This Kolaveri Di गाण्याने लोकांना लावलेलं वेड; 90 टक्के लोकांना आजही माहिती नाही त्याचा अर्थ )
मोनिका भदोरियाने ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “असित कुमार मोदी यांनी मला धमकी दिली की, ती मुंबईत काम करु शकणार नाही. मी आधीच माझी आई गमावल्याच्या मानसिक आघातातून जात होते. आणि इथे ते मला माझं करिअर बरबाद करण्याची धमकी देत होते. आणि त्याचा माझ्या करिअरवर खरोखरच परिणाम झाला आहे.”मोनिका भदोरिया पुढे म्हणाली की, “शो सोडल्यानंतर मला काम करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्याचा माझ्या आयुष्यावर आणि करिअरवर परिणाम झाला आहे.” मोनिकाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी याला ‘उद्धट’ म्हटलं आणि पुढे असा दावा केला की, तो कधीच कोणाशीही आदराने बोलत नाही.
काही काळापूर्वी घडलेला एक प्रसंग सांगताना मोनिका भदोरिया म्हणाली, “एकदा सोहेल रमाणीचं दिलीप जोशी सरांशी भांडण झालं आणि तिने दिलीप सरांचं सेटवर येणं बंद केलं. दिलीप सर म्हणाले होते की, सोहेल सेटवर असेल तर मी शूट करणार नाही. असित कुमार मोदी यांना हस्तक्षेप करावा लागला आणि सोहेलला काही काळ सेटपासून दूर राहण्यास सांगितलं आणि हे प्रकरण शांत होईपर्यंत थांबायला सांगितलं”.
मोनिका भदोरियाने असाही दावा केला की, तारक मेहताच्या सेटवरील कलाकारांपैकी एकही कलाकार काम गमावण्याच्या भीतीने निर्मात्यांच्या वागणुकीविरोधात बोलत नाही. जोपर्यंत ते तिथे काम करत आहेत तोपर्यंत त्याच्या विरोधात कोणी बोलणार नाही. मला माहित आहे की तुम्ही त्यांना आता विचाराल तर ते या गोष्टी नाकारतील कारण त्यांना पैसे मिळत आहेत.”असंही बावरी फेम मोनिकाने म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.