पुणे, 6 एप्रिल, चंद्रकांत फुंदे : पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पुण्यातील पिसोळी तिहेरी हत्याकांडानं हादरलं आहे. सख्ख्या पुतण्यानंच आपली काकू आणि तिच्या दोन चुमकल्यांना पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली आहे. वैभव वाघमारे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे, तर आम्रपाली वाघमारे असं मृत महिलेचं नाव आहे. अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी वैभव वाघमारे याला अटक करण्यात आली असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुतण्यासोबत अनैतिक संबंध
समोर आलेल्या माहितीनुसार आम्रपाली वाघमारे या महिलेचे तिचा पुतण्या वैभव वाघमारे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. ती वैभवसोबत पुण्यातील पिसोळी परिसरात राहत होती. मात्र आम्रपालीचे आणखी कोणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. यातून त्यांचा वाद झाला. वादानंतर रागाच्या भरात वैभवनं आम्रपाली तिची सहा वर्षांची मुलगी रोशनी व चार वर्षांचा मुलगा आदित्य यांची गळा दाबून हत्या केली.
तुमच्या शहरातून (पुणे)
कटिंग करताना केस जास्त कापले; नाराज अल्पवयीन मुलानं संपवलं आयुष्य, ठाण्यातील धक्कादायक घटना
आरोपीला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने तिघा मायलेकरांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह खोलीच्या समोरील पत्र्याच्या शेडमध्ये आणला. त्यानंतर घरातील कपडे, बेडशीट व लाकडच्या साह्याने पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्यात आले. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी वैभव वाघमारे याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू अल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.