गुरुग्राम, 14 मे : ऑनलाईन कॅबमधून प्रवास करताना अनेकदा अघटित घटना घडल्याचे तुम्ही वाचले असेल. मात्र, गुरुग्राममध्ये एका कॅब चालकासोबतच अशी घटना घडली आहे. गुरुग्राममध्ये शुक्रवारी तीन प्रवाशांनी ओला कॅब चालकाला लुटल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपींनी चालकाकडून त्याचा आयफोन आणि पाकीट हिसकावल्याचे पोलिसांनी सांगितले. कॅब चालक सचिन कुमारने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना पहाटे 2.45 च्या सुमारास सेक्टर 89-ए मध्ये घडली. तक्रारीत असे म्हटले आहे की गुरुग्राम रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाला उतरवल्यानंतर, कुमारला स्टेशनजवळून पहाटे 2.30 वाजता ओला अॅपवर बुकिंग प्राप्त झाले, त्यानंतर तीन लोक त्याच्या वाहनात चढले.
तक्रारीत म्हटले आहे की, सेक्टर 89-ए मधील शेवटच्या स्थानी पोहोचल्यानंतर एका प्रवाशाने त्याला भाडे दिले. परंतु, कुमारने उर्वरित रक्कम परत करण्यासाठी त्याचे पाकीट काढले तेव्हा तिघांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा फोन आणि पाकीट काढून पळ काढला. दिल्लीच्या सरिता विहार येथील रहिवासी असलेल्या कुमारने सांगितले की, त्याच्याकडे आयफोन आणि 8,000 रुपये रोख, त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्याच्या पाकिटात क्रेडिट कार्ड होते.
वाचा – किशोर आवारे हत्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या आमदाराला होणार अटक?
अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या (आयपीएस) विविध कलमांखाली सेक्टर 10-ए पोलिस ठाण्यात तीन अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सतबीर म्हणाले, “आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत.”
कंपनीत कॅब ड्रायव्हर नेमून दररोज मोठी रक्कम कमावण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने कॅब चालकांची लाखो रुपयांची फसवणूक केली. ही बाब 2019 सालची आहे. फसवणूक झालेल्यांनी त्या वेळी उद्योग विहार पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. त्यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. आता एसीपीच्या सूचनेवरून उद्योग विहार पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.