मो. इकराम, प्रतिनिधी
धनबाद, 1 मे : झारखंडच्या धनबादमध्ये खाद्यप्रेमींची कमतरता नाही, तर दुसरीकडे याठिकाणी भरपूर रेस्टॉरंट्स देखील आहेत. शिवाय, वेळोवेळी खाद्यपदार्थांमध्ये प्रचंड सवलती देखील दिल्या जातात. अशात आज 1 मे पासून पुढील तीन महिन्यांसाठी फूड फॅक्टरीने आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. जिथे तुम्ही फक्त 99 रुपयांमध्ये कोणताही एक पदार्थ अमर्यादित खाऊ शकता. येथे दीडशेहून अधिक खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.
150 हून अधिक पदार्थ –
धनबादच्या सरायधेला येथील ओझोन गॅलेरियाच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या फूड फॅक्टरीने ही घोषणा केली आहे. त्याच्या डेप्युटी जनरल मॅनेजर अर्को घोष यांनी सांगितले की, 150 डिशेसमध्ये पावभाजी, छोले भटुरे, डोसा, पिझ्झा, बर्गर, सँडविच, पास्ता, सिजलर, फ्राइड राईस, नूडल्स, तंदूरी, स्टार्टर, बिर्याणी, भारतीय आणि चायनीज मेन कोर्स, शेक्स आणि स्मूदीज टी कोंबो, मटकी चाय, चांदनी चौक चाट, दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ, द ग्रेट फूड ऑफ चायना, तडका नॉर्थ इंडियन, गो इटालियानो कॉन्टिनेंटल, किंग आणि क्वीन काउंटर सकाळी 11:00 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत उपलब्ध असेल.
फूड फॅक्टरीचे विकास हरी यांनी सांगितले की, या ऑफरमध्ये 3 महिन्यांसाठी टेकवे आणि होम डिलिव्हरी समाविष्ट नाही. जीएसटी रु.99 मध्ये समाविष्ट आहे. संध्याकाळी पाच नंतर, सर्व पदार्थ हे नियमित किंमतीवरच उपलब्ध होतील.
अर्को घोष यांनी सांगितले की, यामागे फूड फॅक्टरीचा उद्देश लोकांना सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांबाबत जागरूक करणे आहे. अधिकाधिक लोकांनी फूड फॅक्टरीत येऊन पदार्थ चाखता यावेत, असा आमचा प्रयत्न आहे. लोकांनी या ऑफरचा नक्की लाभ घ्यावा. फूड फॅक्टरी त्यांच्या सेवेत आहे, असेही त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.