विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई, 10 एप्रिल : धडधड आवाज करणारी बुलेट आपल्याकडे असावी असं प्रत्येक तरुणाला वाटतं. ज्यांच्याकडे असते ते मोठ्या ऐटीमध्ये बुलेट फिरवत असतात. पण, तुम्हाला ऐकून धक्का बसेल अवघ्या काही सेकंदात चोर बुलेट घेऊन पसार होतात. अशाच दोन चोरांना मुंबईत अटक करण्यात आली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मुंबईतील बोरिवली पश्चिम पोलिसांनी अशाच दोन बुलेट बाईक चोरांना अटक केली आहे, जे बुलेट बाईक चोरून अवघ्या काही मिनिटांत पळून जायचे. 29 मार्च रोजी तक्रारदाराने MHB पोलीस ठाण्यात बुलेट बाईक चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबले यांनी त्यांच्या पथकासह या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपींचा मागमूसही लागला नाही. आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता बुलेट बाईक चोरीला गेल्याचे दिसले.
(संतापजनक! दोन भावांनीच केली भावाची हत्या, कारण ऐकून पोलीसही हादरले)
पोलिसांनी त्याचा फोटो काढून आजूबाजूच्या लोकांना दाखवला. आरोपीची ओळख गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून झाली. पोलिसांनी आरोपीला आपला मित्र सांगून त्याचा मोबाईल क्रमांक काढला मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले असता आरोपी गुजरातमधील असल्याचे निष्पन्न झाले.
मुंबईमध्ये बुलेट चोरी करणाऱ्या 2 चोरांना अटक pic.twitter.com/hkBZe1dDf2
— News18Lokmat (@News18lokmat) April 10, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.