मुंबई, 3 एप्रिल : जे लोक स्वातंत्र्यवीरांना माफीविर म्हणतात त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचे मित्र बसतात, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी ते यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत सर्वांनीच सावकरांचा गौरव केला, अशी आठवण फडणवीस यांनी करुन दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यापासून भाजप आक्रमक झाली आहे. राज्यातील अनेक शहरात गौरव यात्रा काढण्यात येत आहे. आज कांदिवली येथील सावरकर गौरव यात्रेत देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सहभागी झाले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेतील सभेला संबोधित केलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील महत्त्वाचे मुद्दे
तुमच्या शहरातून (मुंबई)
जेव्हा जेव्हा सावरकर यांचा अपमान केला जाईल तेव्हा जनता रस्त्यावर उतरेल. सावरकर गौरव यात्रा काढायची गरज आम्हाला यासाठी लागली कारण देशात असे काही सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आले त्यांना देशाचा इतिहास माहीत नाही. जे सावरकरांना माफीवीर म्हणतात त्यांच्यासाठी आम्हाला यात्रा काढावी लागते. राहुल गांधी तुम्ही कधी सावरकर होऊ शकत नाही. तुमची औकात नाही सावरकर होण्याची अशी टीका फडणवीस यांनी केली. तुम्ही सावरकर हि नाही आणि तुम्ही गांधी हि नाही. फिरोज गांधी तुमचे आजोबा यांनी संसदेत सावरकर यांच्या अभिनंदन प्रस्तावाला सर्मथन दिल होतं. राहुल गांधी तुमच्या आजोबांनी काय केलं हे देखील तुम्हाला माहिती नाही.
सर्वात जास्त पैसा इंग्रजांच्या गुप्त हेरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी खर्च केला. लोकमान्य टिळकांनी सांगितले स्वातंत्र्य आमचा जन्म सिद्ध हक्क आहे तर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर सशस्त्र क्रांतीने मिळेल असे सावरकर म्हणाले. सावरकर यांनी जे व्रत घेतले ते शेवटपर्यंत पूर्ण केले. इंडिया हाऊसमध्ये राहत असताना बॉम्ब कसे बनवायचे हे सावरकर यांनी तरुणांना शिकवले. क्रांतीची दिशा सावरकर यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर एकमेव आहेत त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती तरीही सावरकर हसत होते. अनेक स्वातंत्र्य सेनानी असे आहेत ज्यांचा आपण उदोउदो करतो. त्यांना इंग्रजांनी जेलमध्ये तुरुंगात ठेवले पण त्यांना सुख सुविधा दिल्यात. त्यांना जेलमध्ये कुक होता वर्तमान पत्र वाचायला दिले. म्हणून काँग्रेसला सावरकर आणि नेताजी सुभाष चंद्र भोस यांच्याबद्दल तिरस्कार आहे.
वाचा – ‘रिक्षावाल्या’वरून अरविंद सावंतांचा ब्रेक फेल! वादानंतर मारला रिव्हर्स गिअर
काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींपासून यशवंतराव चव्हाण यांनी सावरकरांचा गौरव केला. खरी शिवसेना आमच्या सोबत आहे. उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी सावरकर यांचा अपमान सहन करता कामा नये. मला एक बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दाखवा, ज्यावेळी राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. अलिकडे बाजार बुनगे सुद्धा मोदींवर बोलत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती सावरकर यांनी लिहिली. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले ते सावरकर यांना माफीवीर म्हणतात. अरे लाजा धरा. तुमच्यावर टीका करण्याची माझी इच्छा नाही.
ते माफीविर म्हणतात त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचे मित्र बसतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मित्र पक्षाने सावरकर समलैंगिक होते असे मुखपृष्ठ काढले. तुमच्यामध्ये स्वाभिमान असेल तर कृतीत दिसला पाहिजे. खरा स्वाभिमान तुमच्या कृतीत असता तर राहुल गांधींच्या फोटोला चपला मारण्याचे काम तुम्ही केले असते. खरी शिवसेना आमच्यासोबत आहे म्हणून आम्ही राहुल गांधी यांच्या फोटोला चपला मारण्याचे काम आम्ही केले. हे विसरले आपण कुणाच्या पोटी जन्माला आलो. यांच्यात हिंमत नाही मग बातम्या सोडतात पवार साहेब राहुल गांधी म्हणाले की सावरकर यांच्याबद्दल बोलू नका. हे जेवढे वेळा सावरकर यांचा अपमान करतील तेवढी लोक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही शेवटी फडणवीस यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.