मुंबई : प्रत्येक जण हल्ली आपल्या फोनला पासवर्ड ठेवतं. कोणी पिन तर कोणी पॅटर्न ठेवतं पण एक गोष्ट माहिती आहे का की पिन किंवा पॅटर्न पैकी कोणता सर्वांत स्ट्राँग आहे हे माहिती आहे का? ज्यामुळे तुमचा फोन हॅक होऊ शकणार नाही.
तुम्ही पिन किंवा पासवर्ड जर स्ट्राँग तयार केला असेल, तर हॅकर्स किंवा चोरांना त्याचा अंदाज लावणे कठीण जातं. या प्रकरणात, आपण आपला फोन सुरक्षित ठेवू शकता. स्ट्राँग पासवर्ड म्हणजे संख्या आणि अक्षरे एकत्र करून ठेवलेला पासवर्ड तुम्ही असा पासवर्ड ठेवला तर हॅक होण्याची शक्यता कमी आहे.
1234, 123456, पासवर्ड किंवा नाव, वाढदिवस, जोडीदार किंवा मुलांचा वाढदिवस यासारखे शब्द. पण हे पासवर्ड जसं लक्षात ठेवायला सोपं असतात तसंच त्यांचा अंदाज लावणंही सोपं असतं. तुमचा फोन चोर तुमच्याबद्दल थोडी माहिती काढून तुमच्या सोप्या पासवर्डचा सहज अंदाज लावू शकतो.
पिन किंवा पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या अडचणीमुळे पॅटर्न फीचर अँड्रॉइडमध्ये आले. यामध्ये स्क्रीनवर 9 डॉट्स दिसतात, यापैकी किमान चार डॉट्स कनेक्ट करून तुम्ही फोनसाठी लॉक पॅटर्न तयार करू शकता. लॉक पॅटर्नसहही, बहुतेक लोक तीच चूक करतात जी ते पासवर्डसह करतात.
रिसर्चमध्ये काय म्हटलंय?
तज्ज्ञांनी पॅटर्न की पासवर्ड असा रिसर्च केला. त्यामधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फोनवर 4-6 अंकी पासवर्ड किंवा पॅटर्न टाकणाऱ्या लोकांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून हा रिसर्च करण्यात आला. वेगवेगळ्या कोनातून वेगवेगळ्या फोनवर रेकॉर्डिंग केले जात होते. हे रेकॉर्डिंग सुमारे 1173 लोकांना नियंत्रित पद्धतीने दाखवण्यात आले
या रिसर्चमध्ये असं समोर आलं की 6 डिजिट पिन थोडा सुरक्षित आहे. केवळ 10.08 टक्के लोकच हा फोन अनलॉक करू शकतात असं निरीक्षणातून समोर आलं आहे. मल्टिपल ऑब्जर्वेशनमध्ये हे प्रमाण वाढून 26 टक्क्यांपर्यंत जातं.
6-डॉट अँड्रॉइड पॅटर्नमधील एका निरीक्षणानंतर, 64.2 टक्के हल्लेखोरांनी फोन अनलॉक केला. त्याच वेळी, एकाधिक निरीक्षणांमध्ये हल्ला 79.9 टक्क्यांवर पोहोचला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.