नारायण काळे, प्रतिनिधी
जालना, 19 मे : वासुदेव आला आता वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला म्हणत आपल्या आगळ्यावेगळ्या पेहराव यामुळे बाळगोपलांसह सगळ्यांचेच लक्ष वेधून घेणारा वासुदेव हल्ली शहरात दिसेनासा झालाय. पण, जालना जिल्ह्यात आजही खेडोपाडी काही जणांनी ही परंपरा जिवंत ठेवलीय. ईश्वरभक्ती तल्लीन होत दान मागणारा वासुदेव लहान मुलांचा विशेष आवडता असतो. त्याचबरोर लयबद्ध टाळाच्या गजरात मुखातून नामस्मरण करणारे वासुदेवाचे भजन हे मोठ्यांनाही मंत्रमुग्ध करतात
लोकगीतातून हरिनामाचा गजर करीत पारंपरिक लोकगीतं गाणारे हे वासुदेव सध्या जालनामध्ये अवतरलेत. हे वासुदेव जिल्ह्यातील ठरवलेल्या ठिकाणी त्यांची कला सादर करत आहेत.
तुमच्या शहरातून (जालना)
पूर्वीच्या काळात दर वर्षी वासुदेव घरधनीच्या पूर्वजांचे गोडवे गात. प्रभुनामाची लोकगीते आणि त्यातून घरधनीसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी परमेश्वराचे आशीर्वाद मागत असे. संपूर्ण कुळाचा उद्धार व्हावा, दानातून पुण्यकार्य केल्याचे समाधान लाभावे, यासाठी वासुदेवाला पूर्वी घरोघरी धान्य व दक्षिणा मोठ्या प्रमाणात भेट स्वरूपात दिली जात असे. आधुनिक काळात ही संस्कृती लोप पावत चालली आहे.ग्रामीण भागात मात्र वंशपरंपरागत हा भिक्षुकीच्या व्यवसाय करणाऱ्या वासुदेवाचे दर्शन आजही अधूनमधून होत असते. अशाच एका वासुदेवाचे दर्शन जालना तालुक्यात सध्या सर्वांना होताना दिसत आहे.
पारध्यांची पोरं रस्त्यावर विकत होती फुलं, तीच आता झाली इंजिनियर, एका सिग्नल शाळेची गोष्ट!
अंकुश गवळी हे या वासुदेवाचं नाव आहे. ते जालना जिल्ह्यातील नसडगाव येथील रहिवाशी आहेत. अंकुश यांचा हा परंपरागत व्यवसाय आहे. पूर्वीच्या काळी दान धर्माला खूप महत्व होते त्यामुळे भरपूर दान मिळायचे. आता ही परंपरा नष्ट होतीय. परमेश्वराच्या कृपेनं माझ्याकडं शेती आहे. त्याचबरोबर शिवणकाम करून देखील माझा चरितार्थ चालतो. त्यामुळे मी पूर्णपणे यावर अवलंबून नाही. आमच्या पूर्वजांची परंपरा जपण्याचे काम आपण करत असल्याचं गवळी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.