भागेश्री प्रधान – आचार्य, प्रतिनिधी
डोंबिवली, 15 मे: विकासाच्या मार्गावर चालताना निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे विकास योजनेकडे वळताना पर्यावरणाच्या हातात हात घालून चालले पाहिजे यासाठी पर्यावरण दक्षता मंडळाने पर्यावरणीय चळवळ डोंबिवलीमध्ये उभी केली आहे. या चळवळी अंतर्गत अनेक उपक्रम सुरू असून त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मोफत असणारा नेचर ट्रेल हा उपक्रम आहे. या उपक्रमाचे आयोजन रविवारी डोंबिवलीमध्ये करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना परिसरातील झाडांची ओळख करून देण्यात आली.
…म्हणून करण्यात आले आयोजन
तुमच्या शहरातून (मुंबई)
नवीन पिढीला परिसरातील झाडांची माहिती देणे,झाडाचे महत्व समजावे आणि येणारी नवीन पिढी पुढे पर्यावरण प्रिय व्हावी हा नेचर ट्रेल उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे. आपण ज्या परिसरात राहतो किंवा काम करत असतो त्या परिसरात अनेक झाडे असतात. मात्र, कित्येक झाडांची आपल्याला नावे माहीत नसतात. त्या झाडांचे नेमके महत्त्व काय हे देखील माहीत नसते. त्यामुळे झाडांची नावे आणि वैशिष्ट्ये सांगण्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळातर्फे नेचर ट्रेल उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व कळेल
सध्या शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या आहेत. या विद्यार्थ्यांना आपण ज्या परिसरात राहतो. त्या परिसरातील झाडांची माहिती व्हावी यासाठी डोंबिवलीतील प्रसिद्ध असणाऱ्या फडके रोड गणेश मंदिरापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एक गोल फेरी मारून पुन्हा गणेश मंदिराजवळ येताना परिसरातल्या अनेक झाडांची ओळख मुलांना गोष्टी रूपातून करून देण्यात आली. अशा पद्धतीचा नेचर ट्रेल पर्यावरणीय संघटनांनी सातत्याने घेतला पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व कळेल, असं मत यावेळी पालकांनी व्यक्त केले.
कोणत्या झाडाची झाली ओळख
हा नेचर ट्रेल विद्यार्थ्यांसाठी मोफत होता. यावेळी जांभूळ, पिंपळ, गुलमोहोर, अशा विविध झाडांची ओळख करून देताना विविध गोष्टींचा आधार घेण्यात आला. त्यामुळे गोष्टी स्वरूपात सांगितलेली झाडांची ही ओळख विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून गेली.
कल्याणचा राखणदार असलेला दुर्गाडी किल्ला, शिवाजी महाराजांशी आहे जवळचा संबंध, Video
हा उपक्रम रविवारी पार पडला असून विद्यार्थ्यांनी छान प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम नेहमीच राबवले जातात. यामध्ये पक्षी निरीक्षण, फुलपाखरे निरीक्षण, विविध झाडांची ओळख करून देणे अशा पद्धतीचे हे उपक्रम असतात. मात्र, त्याच्या शाळेशी चर्चा करून शाळेच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन असे उपक्रम करत असतो. यावर्षी पहिल्यांदाच सुट्टीच्या दिवसात सर्व विद्यार्थ्यांसाठी हा नेचर ट्रेलचा उपक्रम राबवण्यात आला. मात्र मुलांनी आणि पालकांनीही छान प्रतिसाद दिल्याने सुट्टीमध्ये पुन्हा असे उपक्रम राबवले जाणार आहेत. तरी यामध्ये सहभागी व्हावे अशी माहिती पर्यावरण दक्षता मंडळाच्या डोंबिवली शाखेच्या व्यवस्थापिका रुपाली शाईवाले यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.