मुंबई, 24 एप्रिल : नेटफ्लिक्स हा लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. नेटफ्लिक्सवरील वेब सीरिज व चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कोट्यवधी आहे. अनेक युजर्स नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेऊन या सीरिज व चित्रपट पाहण्याचा आनंद घेतात. पण जर तुम्हीही Netflix वापरत असाल तर सावधगिरी बाळगा. त्याचं कारण म्हणजे नुकतीच एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार नेटफ्लिक्स वापरल्यामुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते.
हॅकर्सना नेटफ्लिक्सवरून डेटा चोरण्याचा एक नवीन मार्ग सापडला आहे. त्याचा वापर करून हॅकर्स तुमच्या बँकेतील पैसे लुबाडू शकतात. त्यामुळे नेटफ्लिक्सच्या वापराबाबत सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. या डेटा चोरीला नेटफ्लिक्स थेट जबाबदार नाही. काही हॅकर्स नेटफ्लिक्सच्या नावाने बनावट मेल पाठवून नेटफ्लिक्स खातं सस्पेंड झाल्याची माहिती देतात. या मेलमध्ये एक लिंक येते, ज्यावर क्लिक केल्यानंतर युजर्सचा डेटा हॅक होतो.
अशा प्रकारे, युजर्सना फसवून त्यांची माहिती घेतली जाते. त्यामुळे युजर्सनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि फक्त नेटफ्लिक्सच्या मूळ वेबसाइटवर लॉग इन केलं पाहिजे.
मुलांनी बॅटरी गिळली तरी आता टेन्शन नाही; पोटात गेल्यास धोक्याऐवजी उलट फायदाच होईल
मीडिया वृत्तानुसार रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार, क्रिमिनल ऑर्गनायझेशन्स फिशिंगचा वापर अकाउंट इंफॉर्मेशन चोरण्यासाठी करतात. त्यानंतर ते अशा युजर्सची फसवणूक करतात, ज्यांना टेक्नॉलॉजीबद्दल जास्त माहिती नाही. अशा परिस्थितीत ब्रँड फिशिंग हल्ल्याचे बळी ठरण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी युजर्सना टेक्नोलॉजीची माहिती असणं आवश्यक आहे.
युजर्स आपल्या अकाउंटची सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक पर्याय निवडू शकतात. ते डेटा एन्क्रिप्शन, स्ट्राँग पासवर्डचा वापर करून आपलं अकाउंट सुरक्षित करू शकतात. यासोबतच युजर्सना ब्रँड फिशिंगबद्दल माहिती असायला हवी. शिवाय आपल्या ई-मेल अकाउंटवर येणारे स्पॅम मेल इग्नोर करायला हवेत. असे मेल उघडून युजर्सनी त्यांना रिप्लाय देऊ नये.
3 स्टार की 5 स्टार? कोणत्या एसीला किती बिल येतं? दोघाचं गणित समजून घ्या
नेटफ्लिक्स हा सर्वांत जास्त पाहिला जाणारा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. या ओटीटीचे जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. बरेच जण याचं पर्मनंट सबस्क्रिप्शन घेतात. त्यामुळे सायबर क्रिमिनल्सनी त्यांची फसवणूक करण्याचा नवा मार्ग शोधला आहे. ते फेक मेल पाठवून युजर्सची फसवणूक करतात व त्यांचे बँक डिटेल्स मिळवतात, त्याच डिटेल्सचा वापर करून ते युजर्सच्या अकाउंटमधील पैसे लांबवतात. अशी सायबर फसवणूक टाळण्यासाठी युजर्सनी आपलं अकाउंट सुरक्षित असल्याची खात्री करणं व फेक मेसेजेसकडे दुर्लक्ष करणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.