ठाणे, 05 एप्रिल : फडणवीस साहेब तुमच्या घरात 2006 पासून घरात घुसलेली बाईला आधी त्याचा बंदोबस्त करा, मग घरात घुसण्याची भाषा करा, तुम्ही स्वत:ला काडतूस समजत असाल तर उद्धव ठाकरे हे तोफ आहे, तोफेसमोर काडतुसाचा निभाव लागत नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जशास तसे उत्तर दिलं.
तुमच्या शहरातून (मुंबई)
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महाविकास आघाडीने ठाण्यात महामोर्चा काढला. यावेळी सुषमा अंधारे यांनी जोरदार भाषण करत भाजपवर हल्लाबोल केला.
बावनकुळे साहेब ज्या वेशात तुम्ही बोलला, याचा अर्थ संघटना तुमचं ऐकतंय. भाजपमध्ये तुमचा दबदबा आहे. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुमची इतकी हिंमत आहे मग तुमचं तिकीट फडणवीस यांनी का कापलं? तरीही त्यांचं म्हणणं असेल मातोश्रीच्या बाहेर पडू देणार नाही. आम्ही चांगली माणसं आहोत. बावनकुळे साहेब तुम्हाला आवाहन देते, तुमचं काय आहे, हिंमत असेल तर 48 तासांमध्ये मातोश्रीवर या, असं चॅलेंजच सुषमा अंधारेंनी दिला.
माननिय गृहमंत्र्यांना फडतुस म्हटल्यामुळे राग आला आहे. आम्ही तुम्हाला फडतुस म्हणू नये अशी अपेक्षा आहे, पण तुमच्या एक फडतुस आमदार बाई म्हणून उल्लेख करतो, त्याची तक्रार तुम्ही घेतली का? असा थेट सवाल सुषमा अंधारेंनी केला.
रोशनी शिंदेंची तक्रार पोलिसांनी घेतली, उलट तिच्यावरच गुन्हे दाखल केले आहे. ती माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. बाहेर पोलीस म्हणतात, आमची विनंती आहे. पोलिसांना सामन्यांचं रक्षण करण्याची शपथ घेतली आहे ना? असा सवालच अंधारेंनी पोलिसांना विचारला.
जर एखादी महिला गरोदर नसेल तरीही तिच्या पोटात लाथाबुक्का मारण्याचा परवाना तुम्हाला कुणी दिला आहे. वेगवेगळ्या कामातून तुम्हाला वेळ मिळत नाही. पोलीस आयुक्त आम्हाला वेळ देत नाही मग आम्ही कुणाकडे दाद मागायची? असा सवाल सुषमा अंधारेंनी केला.
उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचा फडतूस म्हणून असा उल्लेख केल्यामुळे भक्त चांगलेच चेकाळले आणि चवताळले. जेव्हा शिवरायांबद्दल लोढा, लाड आणि कोश्यारी यांनी वापरले त्यावेळी तुम्हाला राग का आला नाही. शिवराय तुमचे दैवत नाही का? चंद्रकांत पाटील यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल खालची भाषा वापरली, काय बाबासाहेब तुमचे दैवत नाही का? असा सवाल अंधारेंनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.