प्रियांका माळी, प्रतिनिधी
पुणे, 17 मे : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढलेला पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हाळ्यात थंड खावं वाटणं हे सहाजिक आहे. कडक उन्हापासून आराम मिळावा म्हणून लोक आईस्क्रीम खाताना दिसतात. यामध्ये सॉफ्ट सर्व्ह आइस्क्रीम म्हणजेच सॉफ्टी ही गरम उन्हाळ्याच्या दिवसात एन्जॉय करण्यासाठी सर्वात थंड ट्रीट आहे. या थंड प्रकारामध्ये मऊ, मलईदार क्रीम असते. हीच सॉफ्टी कशी बनवली जाते हे आज तुम्हाला सांगणार आहोत.
पुण्यातील सचिन कांबळे यांचे आशा सॉफ्टी डीलाइट नावाने छोटे सॉफ्टी सेंटर आहे. त्यांनी 2021 ला यांची सुरुवात केली होती. सुरुवातीला हे सॉफ्टी सेंटर वारजे येथे उघडण्यात आले आणि त्यानंतर कर्वेनगर, आनंद नगर अशा ठिकाणी आशा सॉफ्टी सेंटरच्या शाखा उघडल्या आहेत. सचिन कांबळे यांनी सॉफ्टी कशी बनवली जाते याबद्दल माहिती दिली आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
कशी बनवली जाते सॉफ्टी?
या प्रकारच्या आइस्क्रीममध्ये फ्रोझन आइस्क्रीमपेक्षा दुधाचे फॅट कमी असते. दुधाचे फॅट 3 टक्के ते 6 टक्के पर्यंत असते तर फ्रोझन आइस्क्रीममध्ये 10 टक्के ते 18 टक्के पर्यंत दुधाचे फॅट आढळते. आणि -15°C तापमानात साठवलेल्या आइस्क्रीमच्या तुलनेत -4°C तापमानात सॉफ्टी तयार होते. या प्रकारच्या आइस्क्रीममध्ये हवेचे प्रमाण असते जे गोठवण्याच्या वेळी सादर केले जाते. हवेच्या प्रमाणामुळे सॉफ्ट आइस्क्रीमची चव बदलते.
कमी हवेचे प्रमाण असलेल्या उत्पादनामध्ये बर्फाची चव जास्त असते आणि त्याचा रंग अधिक पिवळा असतो. सॉफ्टी आइस्क्रीम ज्यामध्ये हवेचे प्रमाण जास्त असते ते क्रीमियर, नितळ, चवीला सौम्य आणि रंगाने अधिक पांढरे असते. सॉफ्टीमध्ये हवेचे प्रमाण ते बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या इतर घटकांवर अवलंबून असते. सॉफ्ट आइस्क्रीम हे दूध, आइस्क्रीम पावडर इत्यादींचा कच्चा माल म्हणून वापर करून बनवले जाते आणि ते सॉफ्ट कोणमध्ये भरून दिले जाते.
10 वर्षांच्या मुलांसोबत हजारो फूट उंचावरून घेतली उडी, पुणेकर शीतलची थरारक कहाणी
काय आहे किंमत?
आपल्याकडे नॉर्मल सॉफ्टीची सुरुवात 25 रुपयांपासून होते आणि 55 रुपयांपर्यंत रेंज संपते. येथील मॉन्स्टर क्रंच हा सॉफ्टीचा प्रकार ग्राहकांच्या सर्वात आवडीचा असल्याचे आशा सॉफ्टी डीलाइट सेंटरचे मालक सचिन कांबळे यांनी सांगितले.
गुगल मॅपवरून साभार
कुठे खाल सॉफ्टी?
पुण्यातील कर्वेनगरमध्ये शाहू कॉलनीत खाऊ गल्लीत आल्यानंतर तुमच्या डाव्या हाताला आशा सॉफ्टी डीलाइट नावाने छोटे सॉफ्टी सेंटर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.