मुंबई, 22 मे: मराठी मनोरंजन सृष्टीतील विनोदी अभिनेता कुशल बद्रिकेच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. कुशल कामाच्या निमित्ताने किंवा भटकंतीसाठी जिथे जातो तिथला एक तरी असा फोटो शेअर करतो ज्यामुळे सोशल मीडियावर कुशलची हवा असते. कुशलचा फोटो, त्याचे व्हिडिओ तर व्हायरल होत असतातच पण त्याच्या पोस्टची खासियत असते ती म्हणजे त्याने लिहिलेली कॅप्शन. आजकाल विनोदी भूमिकांसोबतच कुशलचा शायराना अंदाज पाहायला मिळतोय. आता कुशलने त्याची बायको सुनैनासाठी एक खास पोस्ट केली आहे. यावेळीही त्याच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं.
या पोस्टमध्ये कुशलने त्याची बायको सुनैना सोबतचा एक फोटो शेअर करत त्याला सुंदर कॅप्शन दिलं आहे. कुशलची बायको सुनैना अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाली आहे. खरतर त्याची बायको एक नृत्यांगना आहे. तिचं ‘मुघल ए आजम’ हा कार्यक्रम प्रचंड गाजला. आता या कार्यक्रमाचा प्रयोग आता साता समुद्रापार अमेरिकेत होणार आहे. त्यासाठीच कुशलची बायको सुनैना अमेरिकेला रवाना झाली आहे. कुशलने पोस्ट करत बायकोचं अभिनंदन केलं आहे.
कुशलने बायकोसाठी लिहिलंय कि, यार सुनयना, तू काय बाबा आता “अमेरिकेला” जाणार, “मुघल ए आजम” मधे, डांस बिंस करणार, पिझ्झा बर्गर खाणार , झ्याक-प्याक राहणार..जायचं आहे तर जा, “आमाला काय…. बाबा” खरंतर एवढे दिवस तुझ्यावाचून राहायची सवय नाही ना “घराला” म्हणून जरा काळजाला “घरं” पडल्या सारखं झालंय बस. बाकी तू परत येशील तेंव्हां…हा ऋतू बदलला असेल, पाऊस, “कुणीतरी पाणी शिंपडावा” एवढाच् उरला असेल, शाळेत मुलांचे वर्ग आणि मित्र बदललेले असतील, “मनुची” हाफ पँट जाऊन फुल पँट आली असेल, “गंधूची” परीक्षा जवळ आल्यामुळे अख्ख घर अंडरप्रेशर असेल’
TMKOC: ‘त्यांनी मला माशीसारखं बाहेर फेकलं…’ तारक मेहताच्या रिटा रिपोर्टरचा असित मोदींवर हल्लाबोल
त्याने पुढे म्हटलंय कि, ‘काय गंमत आहे बघ, कधी काळी, “आपलं सुद्धा एक घर असेल”, अशी स्वप्नं पापण्यांत घेऊन, आपण घराच्या वाटेकडे डोळे लाऊन बसायचो, आता “तुझ्या” वाटेकडे “आपलं घर” डोळे लाऊन बसेल…आणि मी मी, छोट्टीशी खोली होऊन जाईन त्या घरातली, नुसत्या भिंतींची…. तुझ्या वाचून रिकामी…आणि मुघलांनी अमेरिके वर कधीच राज्य केलं नाही, पण “मुघल ए आजम” ह्या तुमच्या कार्यक्रमाने अख्खी अमेरिका जिंकावी ह्या सगळ्यांना शुभेच्छा.
कुशलच्या या पोस्टनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. प्रत्येक पोस्टच्या शेवटी कुशल सुकून असं लिहित असतो. अनेक चाहते कुशलच्या या पोस्टवर चाहते सुनैनाचं अभिनंदन करत आहेत. कुशलने बायकोसाठी केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी ‘भावा हे… जमलं बाकी… सगळं काही मराठी मध्ये लिहिलंस…’, ‘कुशल दा मस्त… अभिनंदन पुढिल वाटचालीसाठी’ अशा शब्दात कमेंट करत चाहत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.