मुंबई, 21 मे : भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. काल बीडमध्ये शिवसेना ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा पार पडली, या सभेवरून नितेश राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बीडमध्ये झालेल्या सभेत ठाकरे गटाचे किती लोक होते असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत बोलताना मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे.
नेमकं काय म्हणाले राणे?
नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बीडमध्ये झालेल्या कालच्या सभेत ठाकरे गटाचे किती लोक होते? ही सभा ठाकरे गटाची होती की राष्ट्रवादी काँग्रेसची होती हे त्यांनी सांगावं. सभेला पाचची वेळ देण्यात आली सभा आठला सुरुवात झाली. रॅलीमध्येही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. आर्ध्या खुर्च्या रिकाम्या दिसल्यानंतर राष्ट्रवादीला फोन करून विनंती करण्यात आली, असा खोचक टोला नितेश राणे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
उद्धव ठाकरेंबद्दल गौप्यस्फोट
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे असताना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचं होतं म्हणून युतीची सत्ता गेली. हे खरं आहे की नाही हे संजय राऊत यांनी सांगावं असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.