मुंबई, 14 एप्रिल : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. परंतु यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. जोपर्यंत राहुल गांधी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिला आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहीत पवार यांन चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हटलं रोहित पवार यांनी?
तुमच्या शहरातून (पुणे)
‘कोणत्याही महापुरुषाचा अवमान करणं चुकीचंच आहे. पण एका भोंदूबाबाने श्री साईबाबा आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अवमान केल्यानंतर आणि भाजपच्या एका प्रवक्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी अवाक्षरही काढलं नाही. उलट त्या भाजपच्या प्रवक्त्याचं राज्यात स्वागत केलं’
कोणत्याही महापुरुषाचा अवमान करणं चुकीचंच आहे. पण एका भोंदूबाबाने श्री साईबाबा आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अवमान केल्यानंतर आणि भाजपच्या एका प्रवक्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष @cbawankule साहेब यांनी अवाक्षरही काढलं नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 14, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.