मुंबई, 15 एप्रिल- मराठमोळी अश्विनी महांगडे सध्या तिच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटामुळं चर्चेत आली आहे. या सिनेमात अश्विनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. अश्विनीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या सिनेमामुळं अश्विनीची एक इच्छा पूर्ण झाली आहे. अभिनेत्रीनं सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.
अश्विनीनं अभिनेता अंकुश चौधरीसोबतचा फोटो शेअर करत तिची अंकुश चौधरीसोबत काम करण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. पण तिची ही इच्छा पूर्ण करण्यामाग तिनं तिची एका आठवण सांगितली आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, कॉलेज संपवून कला क्षेत्रात काम मिळावे म्हणून मुंबई ला आले तेव्हा माझ्या आत्याने माझा प्रेमाने, मायेने सांभाळ केला.
त्यावेळी कधीतरी बोलताना आत्याने विचारले की कोणत्या हिरो सोबत काम करणार तू? आणि क्षणाचाही विलंब न करता सहज बोलले की अंकुश चौधरी. बहुतेक तेव्हा देवी लक्ष्मी “तथास्तु” म्हणाली असावी. 🙂हिरो…… अंकुश चौधरी. 💫 @ankushpchaudhariकलाकार म्हणून उत्तम काम करता यायला हवं. एवढी एक इच्छा माझी माझ्याकडून कायम असते.
वाचा-‘विठूराया वारी नाही हे वाईटच झालं, पण…’ ; चिमुकल्याने म्हटली संकर्षणची ‘ती कविता
शाहीर साबळे यांच्या जीवनावर केदार शिंदे ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट करत असून त्यामध्ये अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकरताना दिसत आहे. या चित्रपटाला संगीत अजय अतुल यांनी दिलं आहे. यातील अनेक गाणी चाहत्यांच्या आवडीची आहेत. या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या पत्नीची भूमिका केदार यांची मुलगी सना शिंदे तर आजीची भूमिका अभिनेत्री शुभांगी सदावर्ते साकारणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.