पुणे, 17 एप्रिल : पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील रावेर भागामध्ये मोठी घटना घडली आहे. पावसाच्या आडोशाला थांबलेल्या प्रवाशांवार होर्डिंग कोसळले आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांवर शिवविच्छेदन सुरू असताना मनसे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये मदत दिल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
काय आहे मनसेची भूमिका?
होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांवर शिवविच्छेदन सुरू आहे. यावेळी महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मृतकांच्या नातेवाईकांना 25 लाखाची मदत आणि दोशींवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मनसेने घेतली आहे. रुग्णालय परिसरात दाखल झालेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही जमावाने घेराव घातला आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
काय आहे घटना?
वादळी पावसाने रावेत किवळे येथील कात्रज बायपास जवळच्या सर्व्हिस रोडवर एका पंक्चरच्या दुकानाजवळ येणारे जाणारे प्रवाशी थांबले होते. पण अचानक जाहिरातीचा फलक कोसळला यात आठ जण अडकले होते. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ देहूरोड पोलीस आणि रावेत पोलिसांच्या टीम आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर या लोकांना बाहेर काढले.
वाचा – पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वंदे भारत एक्सप्रेसपेक्षाही सुसाट गाड्या; या गाड्यांचा समावेश
होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुर्घटनेतील मृतांची नावं
भारती मंचळ (वय-30 रा. शितलनगर, देहूरोड)
शोभा विनय टाक (वय-50, रा. पारशी चाळ, देहूरोड)
अनिता उमेश रॉय (वय-45 रा. देहूरोड)
वर्षा केदारे (वय-40 रा. शितलनगर, देहूरोड)
राम प्रल्हाद आत्मज (वय-20, उत्तर प्रदेश)
जखमींची नावे
रहमद मोहमद अंसारी (वय-21 रा. किवळे)
विशाल शिवशंकर यादव (वय-20 रा. उत्तर प्रदेश)
रिंकी दिलीप रॉय (वय-45 रा. देहूरोड)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.