मुंबई, 10 मे: बॉलीवूड चित्रपटांमधील नायिका नेहमीच आपल्या सौंदर्यासोबतच दमदार अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवतात. त्यापैकी एक अशी अभिनेत्री आहे जिच्या किलर लूकने 70 च्या दशकात लोकांना वेड लावले होते. फक्त तिला पडद्यावर पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये जाऊ लागले. आम्ही बोलत आहोत बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री झीनत अमान हिच्याबद्दल. झीनत अमानचे करिअर जेवढे सफल होते तेवढे वैयक्तिक आयुष्य मात्र कधीही स्थिर आणि शांत राहिले नाही. तिने 1978 मध्ये संजय खानशी लग्न केले, परंतु संजय खानने झीनतसोबत असे काही केले, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
1970 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी ‘मिस एशिया पॅसिफिक स्पर्धा’ जिंकणारी झीनत अमान तरुणांची आवडती अभिनेत्री बनली. झीनत प्रसिद्ध चित्रपट अभिनेता रझा मुराद यांची चुलत बहीण देखील आहे. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यात असे काही घडले, जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. झीनत खान आणि तिचा माजी पती संजय खान यांच्या नात्यातील कटुता सगळ्यांनाच माहीत आहे. संजय खान झीनतला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायचा. एका हॉटेलमध्येही संजय खानने झीनतला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हे तिच्या चाहत्यांना जेव्हा समजलं तेव्हा चांगलीच खळबळ माजली होती.
झीनत तिच्या चित्रपटाचे शूटिंग लोणावळ्यात करत होती. त्यानंतर संजय खानने तिला मुंबईत येण्यास सांगितले. संजय खान त्यावेळी अभिनयासोबत ‘अब्दुल्ला’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. या चित्रपटात झीनतचीही भूमिका होती. संजयला चित्रपटातील एका गाण्याचा राहिलेला भाग शूट करायचा होता, म्हणून त्याने झीनतला मुंबईला बोलावले. मात्र, झीनतने इतर काही निर्मात्यांना तारखा दिल्या होत्या. म्हणून तिने येण्यास नकार दिला, तरी ती संजयच्या प्रेमामुळे मुंबईत आली.
ऋषी कपूरच्या ‘या’ अभिनेत्रीला झालेला तुरुंगवास; त्या एका चुकीमुळे बरबाद झालं करिअर
मुंबईत पोहोचल्यानंतर झीनतला समजले की संजय त्याची पत्नी जरीनसोबत ताज हॉटेलमध्ये पार्टी करत आहे. जेव्हा झीनत अमान हॉटेल ताजमध्ये पोहोचली तेव्हा संजयला समजले की ती त्याच्या पत्नीच्या उपस्थितीत त्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आली होती. यानंतर त्याचा संयम सुटला आणि त्याने झीनतला हॉटेलच्या खोलीत बेदम मारहाण केली. संजय खान यांनी झीनतला केस पकडून वारंवार लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली जात होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय खानची पत्नी जरीनने झीनतला मारहाण केल्याबद्दल तिच्या पतीचे कौतुक केले होते. जेव्हा संजय अभिनेत्रीला मारहाण करत होता. त्यावेळी हॉटेलचे कर्मचारी किंवा या पार्टीत उपस्थित कोणीही त्याला वाचवण्यासाठी आले नाही. त्यात जरीन फक्त त्या खोलीत हजर होती, पण संजयला थांबवण्याऐवजी तिने त्याला प्रोत्साहन दिले. झीनत अमानने पती संजय खानने एवढी मारहाण करूनही पोलिसांत गुन्हा दाखल केला नाही. कारण झीनत त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती. यामुळेच त्यांनी संजयला माफ करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, ही संपूर्ण घटना लोकांसमोर आली जेव्हा झीनतने एका प्रकाशनाला मुलाखत देताना सांगितले की, संजय खानने तिला मारहाण करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही एकदा संजयने तिला एवढी मारहाण केली होती की तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तिच्या बरगड्यांनाही खूप दुखापत झाली होती.
याबाबत संजय खान यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, झीनत अमानच्या डोळ्यांचा त्रास तिच्या जन्मापासून सुरू आहे. त्याने सांगितले की झीनतची आई स्ट्रॅबिस्मस नावाच्या आजाराने ग्रस्त होती. मात्र, त्यावेळी अभिनेत्रीच्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितले होते की, संजय खान आणि झीनत यांच्यात काय झाले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कोणी असा कसा असू शकतो की तो एका महिलेला इतक्या क्रूरपणे मारतो की ती आयुष्यभर जखमी होते. तो तुरुंगात असायला हवा होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.