मुंबई, 21 एप्रिल : मोठी बातमी समोर येत आहे. खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. संजय राऊत यांनी मुलुंड न्यायालयात नारायण राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. भांडूप येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना नारायण राणे यांनी राऊतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणात आता संजय राऊत यांनी राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
फेब्रुवारीत पाठवली होती नोटीस
तुमच्या शहरातून (मुंबई)
संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात नारायण राणे यांना फेब्रुवारी महिन्यात कायदेशीर नोटीस पाठवली होती. राणे यांनी पुराव्यानिशी त्यांचा दावा सिद्ध करावा असं या नोटीसीमध्ये राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र नारायण राणे यांनी या नोटीसीला उत्तर न दिल्याने संजय राऊत यांनी अखेर नारायण राणे यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
नेमकं काय म्हटलं होतं राणेंनी
आपण शिवसेनेत असताना संजय राऊत यांना राज्यसभेवर निवडूण आणण्यासाठी मी खर्च केला होता. संजय राऊत यांचं मतदार यादीत नावही नव्हतं, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. दरम्यान या प्रकरणात संजय राऊत यांनी नारायण राणे यांना फेब्रुवारी महिन्यात कायदेशईर नोटीस पाठवली होती. राणे यांनी पुराव्यानिशी त्यांचा दावा सिद्ध करावा असं या नोटीसीमध्ये राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र नारायण राणे यांनी या नोटीसीला उत्तर न दिल्याने संजय राऊत यांनी अखेर राणेंविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.