मुंबई, 3 एप्रिल : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेला 31 मार्च पासून सुरुवात झाली आहे. दररोज प्रेक्षकांना आयपीएलमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळत असून आयपीएलच्या 16 व्या सीजनला देखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अशातच आज आयपीएलचा सहावा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनऊ जाएंट्स यांच्यात रंगणार आहे.
चेन्नईच्या एम ए चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध लखनऊ यांच्यात सोमवारी 3 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजता सामना होणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने चेन्नईचा संघ तब्बल चार वर्षांनी आयपीएलचा सामना खेळणार असून याकरता चेन्नई सुपरकिंग्स सह त्यांचे चाहते देखील उत्साहित आहेत. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स ला गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. तर लखनऊ जाएंट्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्यांच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला होता. आज एम एस धोनीचा चेन्नई संघ आपल्या होम ग्राउंडवर विजय मिळवून पॉईंट टेबलमध्ये मुसंडी मारण्यासाठी मैदानात उतरले. तर लखनऊचा संघ आयपीएलमधील आपली विजयी घोडदौड सुरु ठेवण्याचा प्रयत्न करेल.
IPL 2023 RCB vs MI : धोनीकडून काहीतरी शिक! मुंबईच्या पहिल्याच सामन्यावेळी रोहित का झाला ट्रोल?
चेपॉक स्टेडियमवरील दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाच्या प्लेईंग 11 मध्ये विशेष बदल होण्याची शक्यता नाही. चेपॉक स्टेडियमची खेळपट्टीवर आतापर्यंत फिरकीपटूंचा दबदबा राहिला आहे. पहिल्या सामन्यात धोनीने दुसऱ्या इनिंगमध्ये अंबाती रायडूच्या जागेवर तुषार देशपांडेला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवले होते. तेव्हा दुसऱ्या सामन्यात तुषार देशपांडेच्या जागेवर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सिमरनजीत सिंग खेळू शकतो. तर चेन्नईने प्रथम गोलंदाजी केल्यास, या दोन्ही खेळाडूंपैकी एक खेळाडू टीममध्ये असेल आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून अंबाती रायडूची एन्ट्री होईल.
चेन्नई सुपरकिंग्सची प्लेईंग 11 :
एम एस धोनी, ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉन्वे, बेन स्टोक्स, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मिचेल सेंटनर, दीपक चाहर, राजवर्धन हंगरगेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.