रायचंद शिंदे, प्रतिनिधी, जुन्नर : मालकाच्या उशाला शांत झोपलेल्या कुत्र्याला दबक्या पावलांनी येऊन कधी बिबट्याने नेलं ते कळलंच नाही. मालकाला कुत्रा ओरडल्याचा आवाज आला म्हणून उठला. दोन मिनिटं काय झालं कळलं नाही म्हणून त्याने आपला मोबाईल काढून सीसीटीव्ही पाहिला तेव्हा हा संपूर्ण प्रकार त्याला समजला.
बिबट्या दबक्या पावलांनी आला आणि मालकाच्या उशाशी झोपलेल्या सुरक्षा करणाऱ्या कुत्र्याचीच शिकार करून गेल्याची घटना जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे घडली आहे. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या घटनेत तरुण वाचला आहे. बिबट्याने त्याच्यावर कोणताही हल्ला केला नाही.
हरणाजवळ जात गोरिलाने जे काही केलं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, मन जिंकणारा VIDEO
तुमच्या शहरातून (पुणे)
जुन्नर तालुक्यातील कल्याण-नगर महामार्गावर आळेफाटा परिसरातील ज्ञानेश्वर माऊली बॉडी बिल्डर्स यांच्या पत्रा शेडमध्ये बिबट्या घुसला. त्याने पाळीव कुत्र्याची शिकार केली आणि तो त्याला घेऊन पसार झाला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे.
दबक्या पावलांनी आला आणि मालकाच्या उशाशी झोपलेल्या सुरक्षा करणाऱ्या कुत्र्याचीच शिकार करून गेला #cctv #marathinews #pune pic.twitter.com/lcxRPkSVen
— News18Lokmat (@News18lokmat) May 16, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.