रायचंद शिंदे, मंचर, 08 मे : पुण्यात दीड महिन्यापूर्वी हिंजेवाडीत बिबट्याने एका पाळीव कुत्र्याची शिकार केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यातील आंबेगावमधील मंचर इथं असाच प्रकार समोर आलाय. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. तब्बल सहा फूट उंचीच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून बिबट्याने कुत्र्याला ठार केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं. मंचरमधील या घटनेनंतर शहरासह परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
मंचरमधील एस कॉर्नर इथं श्रीराम वामनराव गांजाळे यांच्या बंगल्यात ही घटना घडली. बंगल्याची संरक्षक भिंत सहा फूट उंच आहे. त्याला लोखंडी प्रवेशद्वारही आहे. संरक्षक भिंत असल्यानं बिबट्या येणार नाही असं गांजाळे कुटुंबियांना वाटत होतं. पण आता घडलेल्या घटनेनं सध्या परिसरातील नागरिक भितीच्या छायेखाली आहेत.
फक्त हिंमत पाहिजे! कुत्र्याने असं काही केलं की सिंहही घाबरुन पळाला, VIDEO पाहून नेटकरीही थक्क
तुमच्या शहरातून (पुणे)
याबाबत अधिक माहिती अशी की मंचर येथील एस कॉर्नर येथे असलेले शेतकरी श्रीराम वामनराव गांजाळे यांच्या बंगल्याला संरक्षण भिंत असून लोखंडी प्रवेशद्वार आहे. बिबट्याच्या या परिसरात वावर आहे. संरक्षण भिंत असल्यामुळे बिबट्या येणार नाही असा गांजाळे कुटुंब यांचा समज होता मात्र तो समज बिबट्याने खोटा ठरवला आहे. बिबट्याने सहा फूट उंच संरक्षण भिंतीवर उडी मारून त्यांचा काळू नावाच्या कुत्र्याला उचलून नेले आहे.
बिबट्या दबक्या पावलांनी आला अन् 6 फूट उंच भिंत ओलांडून केली कुत्र्याची शिकार; VIDEO VIRAL pic.twitter.com/aDJkzjTs40
— News18Lokmat (@News18lokmat) May 8, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.