मुंबई, 21 मे, तुषार रूपनवर : मुंबई भाजप कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भाजप नेते प्रवीण दरेकरांनी भाजप कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत. तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यानंतर आज मुंबईत भाजप मुंबई प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली ही बैठक मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक मानली जाते, मात्र आजच्या बैठकीत प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘सहकार विभागाविषयी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांचा समन्वय नाही. मध्यंतरी गोरेगाव येथे सहकार विभागातर्फे गृहनिर्माण संस्थाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सहकारच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केलं. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थित गृहनिर्माण संस्थाचा डेटा मागवला नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे गृहनिर्माणची मतं ही मोठ्या प्रमाणात आणि महत्वाची आहेत. त्यामुळे तो डेटा घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्याचं मतात रुपांतर करणे, त्यांना प्रेरित करणं त्यांच्यापर्यंत आपल्या योजना पोहोचवणं हे तितकंच गरजेचं असल्याचं मत दरेकर यांनी व्यक्त केलं आहे.
मात्र या गृहनिर्माण संस्थांच्या कार्यक्रमासाठी कोणत्याही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी डेटा मागवला नाही. येणाऱ्या काळात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अलर्ट होणं गरजेचं आहे. सजगतेने जर काम केलं तर कार्यकर्त्यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये समन्वय साधण्यास त्याचा फायदा होईल, असंही दरेकर यांनी यावेळी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.