हर्षिल सक्सेना, प्रतिनिधी
राजस्थान, 30 मे : लग्न म्हणजे दोन जिवांचं मिलन…नवा संसार आणि नव्या जबाबदारीची जाणीव असते. त्यामुळे संसाराला सुरुवात करताना आपल्या सवयी आणि व्यसन दूर ठेवत असतात. पण एका लग्नातला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एका नवरीबाईने नवरदेवाच्या समोरच बोलो जुबा केसरी म्हणत गुटख्याची पुडी तोंडात कोंबली आहे. या प्रकारामुळे वऱ्हाडी तर वैतागून गेले पण सोशल मीडियावर केसरी वहिणी व्हायरल झाल्या आहेत.
त्याचं झालं असं की, राजस्थानच्या बारा जिल्ह्यात शुक्रवारी 26 मे रोजी निर्विघ्नपणे पार पडलेल्या सामूहिक विवाहसोहळ्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. तब्बल 2,222 जोडपे एकत्र बोहोल्यावर चढलेल्या या विक्रमी सोहळ्याची नोंद घेण्यासाठी चक्क लंडनहून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे पथक थेट बारामध्ये दाखल झाले होते. परंतु, या अवाढव्य सोहळ्यात प्रत्येक जोडप्याचे लग्न बारकाईने पाहणे जरी शक्य झाले नसले, तरी एका नवरीचा कहर मात्र लोकांच्या चांगलाच लक्षात आला. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तो पाहून अनेकजण डोक्यावर हात मारून घेत आहेत, तर अनेकजण पोट धरून हसू आवरत आहेत. त्याचे झालंय असं की, या व्हिडीओमध्ये नववधू नवऱ्याच्या समोरच चक्क गुटखा खाताना दिसत आहे.
बारा जिल्ह्यातील बटावदा येथे श्री महावीर गोशाळा कल्याण संस्थेकडून आयोजित केलेल्या या सामूहिक लग्नसोहळ्यात सर्व वधू-वरांसाठी राजेशाही कपडे, उपस्थित मंडळींसाठी भोजन आणि बिदाईचीही अत्यंत सुरेख व्यवस्था करण्यात आली होती. अनेक मान्यवरांच्या आणि लाखो लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मात्र लग्न झाल्यावर सासरी जायला निघालेल्या एका वधूला सासरच्या वाटेवरच गुटखा खायची तलफ लागली. मग काय तिने चक्क नवऱ्यापासून लपवून गुटखा खाल्ला.
(Jalna News : माणूस मेल्यानंतर दिला जात नाही मुखाग्नी, गिधाडं खातात पार्थिव, असं का करतात?)
बिचारीचे दुर्दैव असं की, तिथल्याच एका व्यक्तीने तिचा हा प्रकार व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ काही मिनिटातच व्हायरल करून त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. ‘भाऊचे काही खरे दिसत नाही’, असे अनेकांनी या नवरीच्या नवऱ्याला उद्देशून म्हटले आहे. तसंच आता या सामूहिक लग्नसोहळ्याची चर्चा कमी आणि गुटख्यावाल्या नवरीचीच चर्चा जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, या सोहळ्यात वधू-वरांसाठी तब्बल 3 लाख चौरस फूट जागेवर मंडप बांधण्यात आला होता. ज्यामध्ये सर्वधर्म समानतेची झलक पाहायला मिळाली. एकीकडे २,१११ जोडप्यांनी हिंदू पद्धतीनुसार सात फेरे घेतले. तर दुसरीकडे, मुस्लिम रितीरिवाजांनुसार 111 जोडप्यांचा निकाह पार पडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.