मुंबई, 30 एप्रिल : भारताचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळत असून सध्या तो आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करीत आहे. युजवेंद्र चहलने राजस्थानकडून खेळताना 9 सामन्यांमध्ये 12 विकेट्स घेतल्या असून या दरम्यान त्याने एकदा पर्पल कॅप देखील जिंकली आहे. परंतु एकीकडे युजवेंद्र चहल उत्तम फॉर्ममध्ये असताना त्याच्या दारूच्या नशेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा 30 एप्रिल रोजी त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करीत आहे. परंतु या दिवशी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलमधील 1000 वा सामना खेळवण्यात येणार असल्याने त्याने 2 दिवसांपूर्वीच आपल्या मित्रांना आणि टीममेट्सना मुंबईतील एका हॉटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी दिली. या पार्टीला टीम इंडियातील रोहित शर्माचा खास मित्र असलेला युजवेंद्र चहल देखील उपस्थित होता, सर्वांनी हिटमॅनच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन केले. परंतु या पार्टीतून बाहेर निघतानाच युझी चहलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
12yr old me after drinking Appy Fizz #yuzvendrachahal pic.twitter.com/I9mMe2oPVE
— Tweetera🐦 (@DoctorrSays) April 29, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.