शिवम सिंग (भागलपूर), 28 एप्रिल : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात तिहेरी तलाकची घटना घडली. पती पत्नीचे नेहमी भांडण व्हायचे यातून पतीने आपल्या कल्याणासाठी पत्नीला थेट घटस्फोट दिला आहे. ही घटना बिहारच्या चिचरौन भागातील आहे. पती नेहमी दारू पिऊन पत्नीशी भांडण करायची. यांना 4 अपत्य असल्याने घरचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे. परंतु पती दारू पिण्याच्या पैशावरून नेहमी भांडण करायचा. यातून काल (दि.28) रात्री तिने पतीला दारू पिण्यास मनाई केल्यावर पतीने तिला तिहेरी तलाक दिला. यानंतर पत्नीने पोलिस ठाण्यात जात पतीविषयी तक्रार दाखल केली.
पीडित नाजनीनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो अनेक वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करत आहे. नाजनीनचा 2016 मध्ये मुस्लिम रितीरिवाजांनुसार तिचा विवाह झाला होता. परंतु काही दिवसांनंतर पती अन्वर खान दारू पिऊन तिला वारंवार मारहाण करायचा. याआधीही त्याने घटस्फोट दिला होता.
मात्र, दोन्ही वेळेस आम्ही करार केला आणि एकत्र राहू लागलो. दरम्यान दोन दिवसांपूर्वी 26 एप्रिल रोजी रात्री दारू पिण्यावरून पुन्हा भांडण झाले. यावर त्याने मला घटस्फोट दिला आणि घरातील सर्व दागिने चोरून पळून गेला. नाजनीनने याआधीही घरातून दागिने चोरून विकल्याचे सांगितले.
नाजनीनने 4 मुलांसह पोलीस ठाणे गाठले आणि न्यायाची याचना केली. या प्रकरणाबाबत पीडितेने लेखी अर्ज करून तक्रार दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. पीडित नाजनीनने या प्रकरणाची तक्रार सुलतानगंज पोलिस स्टेशनच्या महिला हेल्प डेस्कवर केली आहे.
न्यूज18 लोकलने महिला हेल्प डेस्कच्या कॉन्स्टेबल रिटा यांच्याशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, तक्रारदार महिलेच्या पतीने दारूच्या नशेत तिहेरी तलाक दिला आहे. सध्या ती महिला तिच्या माहेरी गेली आहे. आम्ही पोलिसांना संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.