दिल्ली, 07 मे : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल 2023मध्ये 50व्या सामन्यात आऱसीबीला 7 विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीने या सामन्यात 20 षटकात 4 बाद 181 धावा केल्या होत्या. दिल्लीची खेळपट्टी पाहता असं वाटत होतं की, आरसीबी सामना जिंकेल पण असं घडलं नाही.
दिल्लीचा सलामीवीर फिल सॉल्टने जबरदस्त खेळी करत आरसीबीच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला आणि दिल्लीच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या सामन्यात आरसीबीचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने केलेली चूक महागात पडली. त्याने सॉल्टचा झेल पकडला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
IPL 2023 RCB vs DC : मॅचनंतर विराट आणि गांगुली पुन्हा आले समोरासमोर, नंतर जे घडलं तुम्हीच पाहा
सामन्यात दिल्लीच्या फलंदाजीवेळी चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने साल्टचा सोपा झेल सोडला होता. वानिंदु हसरंगाने हे षटक टाकलं होतं. त्याच्या तिसऱ्या चेंडूवर साल्टच्या बॅटची कड घेऊन चेंडू मागे गेला. तेव्हा कार्तिकला झेल घेता आला नाही आणि त्याची ही चूक आरसीबीला महागात पडली. सॉल्टचा झेल सुटला तेव्हा तो फक्त 17 धावांवर खेळत होता.
झेल सुटल्यानंतर मात्र सॉल्टने एकही संधी आरसीबीला मिळू दिली नाही. साल्टने 6 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 87 धावा करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. त्याने वॉर्नरसोबत पहिल्या गड्यासाठी 60 धावांची भागिदारी केली. सॉल्ट बाद झाला तेव्हा संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता. शेवटी रिली रोसो आणि अक्षर पटेल यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
आरसीबीने विराट कोहली आणि महिपाल लोमरोर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 181 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल आरसीबीने 16.4 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 187 धावा करत सहज विजय मिळवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.