मुंबई, 15 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 20 वा सामना शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पारपडला. या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा 23 धावांनी पराभव करून होम ग्राउंडवर दुसरा विजय नोंदवला. परंतु या सामन्यात आरसीबीचा फलंदाज दिनेश कार्तिकने खराब परफॉर्मन्समुळे आपल्या नावे नकोसा रेकॉर्ड नोंदवला आहे.
बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी आरसीबीकडून विराट कोहलीने अर्धशतकीय कामगिरी केली परंतु दहाव्या ओव्हरमध्ये त्याची विकेट पडली. यानंतर आरसीबीच्या इतर फलंदाजांनी डाव सावरत 15 व्या ओव्हरपर्यंत 132 धावा केल्या.
आरसीबीच्या मॅक्सवेलची विकेट गेल्यावर संघाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिक मैदानावर आला. दिनेश कार्तिक संघासाठी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा सर्वांना होती. परंतु कार्तिक कुलदीप यादवच्या बॉलिंगचा शिकार ठरला आणि शुन्य धावांवर बाद झाला. आयपीएल २०२३ मध्ये मॅच विनर दिनेश कार्तिक खराब फॉर्मात असून 4 सामन्यांमध्ये दोनदा शून्यावर बाद झाला आहे. यंदाच्या आयपीएल मधील मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात देखील दिनेश कार्तिक 3 चेंडूवर 0 धावा केल्या होत्या. तर इतर दोन सामन्यात ताईने एकूण केवळ 10 धावा केल्या.
Dinesh Karthik in IPL2023
0(3)
9(8)
1(1)*
0(1)
Biggest achievement of BossDK is he got compared with Dhoni#RCBvDC pic.twitter.com/Qv1hqp1BEs
— Gourav 🔥 (@GOATNIstan__) April 15, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.