मुंबई, 4 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यात झालेल्या भांडणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सामन्यानंतर मैदानात झालेल्या राड्यावरून सोशल मीडियावर विराट आणि गंभीरला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. अशातच पत्रकार रजत शर्मा यांनी गंभीरबाबत केलेल्या वक्तव्यावर आता गौतम गंभीरने ट्विट करत सडेतोड उत्तर दिले आहे.
आयपीएल 2023 मधील 43 वा सामना आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात पारपडला. या सामन्यात आरसीबीने लखनऊचा 18 धावांनी पराभव करून विजय मिळवला. परंतु यानंतर मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. लखनऊच्या फलंदाजी दरम्यान 17 व्या ओव्हरमध्ये विराट आणि नवीनमध्ये झालेलया वादाचे पडसाद सामन्यानंतर देखील उमटले. दोन्ही संघाचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना लखनऊचा गोलंदाज नवीन उल हक रागात विराटवर धावून आला तर आपल्या संघातील खेळाडूसाठी गौतम गंभीरने देखील या वादात उडी घेतली. ज्यामुळे मैदानावर विराट कोहली आणि लखनऊचा मेंटॉर गंभीरमध्ये देखील वादावादी झाली.
Rajat sharma 🗣️ “Gautam Gambhir is jealous of Virat Kohli’s success. He’s not able to digest the fact that Kohli is far better than him.” #GTvsDC #LSGvsRCB #gautamgambhir #ViratKohli pic.twitter.com/TetWN2QbOh
— Bharggav Roy 🇮🇳 (@Bharggavroy) May 3, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.