वैभव सोनवणे, प्रतिनिधी
पुणे, 11 मे : राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल अखेर जाहीर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यावर प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. गाडीतून जाताना, आता मी दिल्लीला चाललोय असं सांगू नका, असं म्हणत अजितदादांनी पत्रकारांची फिरकी घेतली.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे चांगलेच चर्चेत आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अजितदादांचं नाव आल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली होती. आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून शिंदे सरकारला दिलासा दिला आहे. याच मुद्यावर अजितदादांना पुणे विमातळावर पत्रकारांनी विचारले असता त्यांनी आपल्या शैलीत खास उत्तर दिले.
तुमच्या शहरातून (पुणे)
अजित पवार यांची सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया pic.twitter.com/1WKsKB8DL4
— News18Lokmat (@News18lokmat) May 11, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.